भारतीय संघाने रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या तिसऱ्या वनडेत विजय मिळवला. तसेच, 3-0ने मालिका खिशातही घातली. या सामन्यात भारतीय संघाने 317 धावांच्या मोठ्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र, भारताच्या वियजापेक्षा जास्त चर्चा ही सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये रिकाम्या असणाऱ्या खुर्च्यांची झाली. आधी माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग याने म्हटले की, वनडे क्रिकेट संपवले जात आहे. यानंतर आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही तिसऱ्या वनडेविषयी भाष्य केले.
खरं तर, हे संपूर्ण प्रकरण केरळच्या क्रीडामंत्र्यांच्या त्या वक्तव्यावरून सुरू झाले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, जे लोक भूकेने मरत आहेत, त्यांनी सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये येण्याची गरज नाहीये.
काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “तिरुवनंतपुरम येथील भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात रिकाम्या स्टेडिअमबद्दल क्रीडामंत्र्यांच्या वक्तव्याला काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने समोर आणले आहे.” एकापाठोपाठ एक ट्वीट करत थरूर यांनी म्हटले की, “मंत्र्याला बहिष्काराने काहीच फरक पडला नाही. विरोध करणाऱ्या लोकांनी मंत्र्यावर बहिष्कार टाकायला पाहिजे होता, खेळाचा नाही.”
1. It appears that my statement yesterday regretting the poor attendance at the third India-SriLanka ODI, as a result of the social media boycott urged by fans enraged by the insensitive remarks of the Kerala Sports Minister, has been misrepresented by some.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 16, 2023
क्रीडा मंत्री काय म्हणाले होते?
खरं तर, रविवारच्या भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील तिसऱ्या सामन्यात अर्धे स्टेडिअम मोकळे होते. यावर राज्याच्या क्रीडा मंत्री व्ही. अब्दुर्रहीमन यांनी तिकीट दरांचा बचाव करत म्हटले होते की, ज्या लोकांना परवडत नाही, त्या लोकांनी सामना पाहण्यासाठी जाण्याची गरज नाहीये. ते म्हणालेले, “कर कमी करण्याची गरज काय आहे? मागणी अशी आहे की, देशात किंमती वाढतच चालल्या आहेत. जेणेकरून कर कमी केला जाईल. जे लोक भूकेने मरत आहेत, त्यांना सामना पाहण्यासाठी जाण्याची गरज नाहीये.”
सोशल मीडियावर बहिष्कार
सोशल मीडियावर अनेकांनी चाहत्यांना स्टेडिअमचे तिकीट विकत न घेता सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा आग्रह केला. यावर शशी थरूर यांनी भाष्य करत म्हटले की, “बहिष्कार हा एक लोकांचा अधिकार आहे, परंतु त्यांनी त्या व्यक्तीला निशाणा बनवले पाहिजे, ज्याचा ते विरोध करत आहेत.” थरूर ट्वीटमध्ये पुढे म्हणाले की, “क्रीडामंत्र्याला याची चिंता नाहीये की, मैदान भरलेले आहे की रिकामे. त्याच्यावर बहिष्काराचा काहीच परिणाम झाला नाही. आंदोलकांनी मंंत्र्यावर बहिष्कार घातला पाहिजे होता, खेळावर नाही.”
2. Boycotts are a democratic right, but they should target the person against whom the boycotters are protesting. I have nothing against those who were understandably outraged by the Minister's callous comment that those who can't afford to buy a ticket need not attend the match.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 16, 2023
काय म्हणाले थरूर?
काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, केरळ क्रिकेट असोसिएशनच्या मंत्र्याच्या असंवेदनशील वक्तव्याशी कोणतेही देणं-घेणं नसले पाहिजे. कारण, यावर्षीच्या शेवटी वनडे विश्वचषकाच्या यजमानपदासाठी ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये रविवारी झालेला सामना खूप महत्त्वाचा होता. सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये जास्त गर्दीची आवश्यकता होती.
4. The KCA, which has nothing to do w/the Minister or his insensitive comments, needed a good turnout to bolster its case for Tvm to be selected as a WorldCup venue later this year. If the low turnout yesterday is held against us by the BCCI, only sports fans will suffer.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 16, 2023
ते म्हणाले की, मंत्री जे म्हणतात, त्यापासून ते बचाव करू शकतात आणि जनतेने सामन्यावर बहिष्कार नव्हता टाकायला पाहिजे. थरूर ट्वीटमध्ये म्हणाले की, “मी सोशल मीडियावर सामन्याच्या बहिष्कारासाठी काही अभियान पाहिले. असे वाटत होते की, त्यांचे अभियान प्रभावी होते. मला वाटते की, सामन्यावर बहिष्कार टाकणे अतार्किक होते. मी इतर भाग्यवान लोकांपैकी एक होतो, जे सामना पाहण्यासाठी पोहोचले.”
3. The SportsMinister, who didn't bother enough to even attend the match, doesn't care if the gallery is full or empty. He was unaffected by the boycott. The protestors should have boycotted the Minister, not the game. The boycott only hurt the future prospects of cricket in Tvm.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 16, 2023
5. That's the point i made yesterday at the stadium. I hear that my comments were only partially reported & have been distorted by some. Hope this thread makes my stand clear, as a cricket fan & as the local MP. I want top-class cricket to flourish in Trivandrum!
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 16, 2023
थरूर यांनी केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं, तर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर आता भारतीय संघापुढे न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. 18 जानेवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. (ind vs sl 3rd odi shashi tharoor statement after yuvraj singh read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! भारताचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात विश्वविक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
महिलांच्या 19 वर्षांखालील टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा विजय; शेफाली बनली ‘प्लेअर ऑफ द मॅच’






