---Advertisement---

IND vs SL: कर्णधार रोहित शर्माचा मोठा निर्णय, पहिल्याच सामन्यातून मॅचविनर खेळाडूचा पत्ता कट!

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2024 4:31 PM
---Advertisement---

भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियम येथे खेळवली जात आहे. रोहित शर्माने एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार म्हणून पुनरागमन केला आहे. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ अस्लंकाने टाॅस जिंकूम प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच श्रीलंकेचा वेगवान मोहम्मद शिराजला पदार्पणाची संधी मिळाली आहे. या दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने धक्कादायक निर्णय घेत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे. रोहित शर्माने रिषभ पंतच्या जागी केएल राहुलला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि कुलदीप यादव हे भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत. शिवम दुबे 2019 नंतर पहिला वनडे सामना खेळत आहे.

रिषभ पंत दुखापतीतून परत येण्याआधी केएल राहुलने यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका चोख बजावली. केएल राहुलने विकेटसमोर आणि विकेटच्या मागे चांगली कामगिरी केली होती. 2023 च्या विश्वचषकातही केएल राहुलची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील मागील संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला होता, पण आता रिषभ पंत परतल्याने केएल राहुलवरच विश्वास दाखवला गेला आहे.

तत्तपूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या स्मरणार्थ भारतीय क्रिकेटपटू हातावर काळ्या पट्टी बांधून सामना खेळत आहेत. अंशुमन गायकवाड यांचा बुधवारी (31 जुलै) मृत्यू झाला होता. ते ब्लड कॅन्सरने त्रस्त होते.

हेही वाचा-

पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या का बांधल्या होत्या? बीसीसीआयने दिले मोठे कारण
केंद्र सरकार तंबाखूच्या छुप्या जाहिरातींवर कारवाई करण्याच्या मूडमध्ये, बीसीसीआयचं होणार कोट्यवधी रुपयांचं नुकसान?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---