नुकताच भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) या संघांमध्ये टी२० मालिका पार पडली. या मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप देत तीन सामन्यांची मालिका खिशात घेतली आहे. या मालिकेतील तीनही सामन्यात भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाबाद अर्धशतकी खेळी खेळली. मालिकेतील सर्वश्रेष्ट खेळाडू म्हणून निवड झाल्यानंतर सुद्धा श्रेयस अय्यर टी२० विश्वचषकात (T20 World Cup) आपले स्थान निश्चित नसल्याचे म्हटले आहे. तो आता याबाबत जास्त विचार करत नसल्याचेही म्हणाला आहे. विश्वचषकापूर्वी तो सर्वोत्तम खेळीचा आनंद घेत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकातील त्याच्या स्थानाबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, “मला वाटते की यावेळी अशाप्रकारचा विचार करणे अयोग्य असेल. मी संघातील स्थान निश्चित करण्याबाबात काहीही बोलू शकत नाही. कारण, मी अगोदर म्हणल्याप्रमाणे संघात खूप स्पर्धा आहे.”
श्रेयस अय्यर पुढे शाॅर्ट चेंडूंबाबात बोलताना म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी त्यावर काम केलेले नाही. मला जशी खेळायची सवय आहे तसे मी खेळतोय. जर तुमची मानसिकता योग्य असेल, तर तुम्हा कोणताही चेंडू खेळू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की शाॅर्ट चेंडू माझी कमजोरी आहे, तर मला काही फरक पडत नाही. शाॅर्ट चेंडूंचा सामना केल्यानंतरच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. यासाठी तुम्हाला वेगळी तयारी करण्याची गरज नाही.”
श्रेयस अय्यरने भारतासाठी ३६ टी२० सामने खेळले असून त्यामध्ये ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामध्ये त्याने ८०९ धावा केल्या आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात २८ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या टी२० सामन्यात ४४ चेंडूत ७४ धावा केल्या. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ४५ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या. त्याने या संपूर्ण मालिकेत २०४ धावा केल्या. आता या दोन संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्याला ४ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडिया विजयीरथावर आरुढ! सलग १२ वा टी२० सामना जिंकत ‘या’ दोन संघांची विश्वविक्रमात बरोबरी
तिसऱ्या टी२०साठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितचा विश्वविक्रम, पाकिस्तानच्या शोएब मलिकला टाकले मागे