---Advertisement---

IND VS SL: दुसऱ्या वनडेपूर्वी संघाला मोठा, स्टार ऑलराउंडर दुखापतीमुळे मालिकेबाहेर

---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान एक अतिशय वाईट बातमी येत आहे. श्रीलंकेचा धोकादायक फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा भारताविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडला आहे. श्रीलंकेच्या संघासाठी हा मोठा धक्का असला तरी भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धोकादायक लेगस्पिनर वानिंदू हसरंगाने भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला होता आणि सामना बरोबरीत आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वानिंदू हसरंगाने 3 बळी घेतले. या सामन्यात वानिंदू हसरंगाने विराट कोहली, केएल राहुल आणि कुलदीप यादव यांना बाद केले होते.

वानिंदू हसरंगासारख्या घातक फिरकीपटूला वगळणे ही श्रीलंकेसाठी भयानक बातमी आहे. त्याचबरोबर वानिंदू हसरंगाला वगळल्याने टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे. वानिंदू हसरंगा डाव्या हाताच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडला आहे. 34 वर्षीय लेगस्पिनर जेफ्री वँडरसेचा शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वानिंदू हसरंगाच्या जागी श्रीलंकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान 10व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना वानिंदू हसरंगाला त्याच्या डाव्या हाताच्या पट्टीत दुखू लागले. यानंतर एमआरआय स्कॅनद्वारे वानिंदू हसरंगाच्या दुखापतीची पुष्टी झाली.

श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात यजमान संघाने शानदार गोलंदाजीचा नमुना साधर केला. संघाने  230 धावांचा यशस्वीरित्या बचाव करुन दाखवले. त्यामुळे सामना टाय झाला. दोन्ही संघासाठी मालिका जिंवत आहे. त्यामुळे आज (04 ऑगस्ट) होणारा दुसरा एकदिवसीय सामना करा किंवा मरा अश्या स्थितीत आहे.

हेही वाचा-

आंतरराष्ट्रीयच नाही तर प्रथम श्रेणी क्रिकटमध्येही ‘हा’ खेळाडू आहे बादशाह!
भारतीय क्रिकेटपटूंना लवकरच मिळणार मोठे गिफ्ट, बीसीसीआय सचिव जय शहा यांची घोषणा
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---