भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) मधल्या फळीत फलंदाजी करत आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत (IND vs SL T20I Series) मिळालेल्या संधीचा फायदा सुद्धा उठवला आहे. त्याने यासाठी कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) आभार मानले आहेत. जडेजाला गुडघ्यावर दुखापत झाली होती त्यानंतर तो बऱ्याच काळानंतर भारतीय संघात परतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने १८ चेंडूत ४५ धावा केल्या. हा सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला. या विजयासह यजमान संघाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. यानंतर रविवारी (२७ फेब्रुवारी) मालिकेतीतल तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यातही भारताने विजय मिळवला आणि मालिका खिशात घातली.
जडेजा दुसऱ्या सामन्यानंतर म्हणाला की, “हो मी ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा फायदा घेत आहे. यामुळे मला वेळ मिळत आहे आणि परिस्थीतीनुसार आपला डाव पुढे वाढवू शकतो. मी रोहित शर्माचे आभार मानतो कारण त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. मी या क्रमवारीत फलंदाजी करू शकतो आणि संघासाठी धावा करू शकतो.”
जडेजा म्हणाला, “भविष्यात जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा मी माझा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल. परिस्थितीनुसार खेळ करेल आणि संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.” स्टार अष्टपैलू जडेजाने गुडघ्याच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या दोन मालिका खेळल्या नाहीत. गुरुवारी परतल्यावर पहिल्या टी२० सामन्यात जडेजाला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले ज्यात त्याने ४ चेंडूत नाबाद ३ धावा केल्या होत्या.
आपल्या निर्णयावर रोहित म्हणाला की, “त्याला जडेजाकडून आणखी योगदान हवे आहे, तो अगोदरच चांगली फलंदाजी करत आहे.” दुसऱ्या सामन्यात जडेजा जेव्हा मैदानात उतरला, तेव्हा भारताला ७ षटकात ५६ धावा हव्या होत्या. जडेजाने झंझावाती खेळी करत भारताने १७ चेंडू राखून सामना जिंकला. जडेजा म्हणाला, “मला बरे वाटत आहे. चांगली कामगिरी करण्याचा मला विश्वास होता. मी माझ्या संघासाठी चांगला खेळलो याचा मला आनंद आहे. आशा आहे की आगामी सामन्यांमध्येही मी हीच कामगिरी कायम ठेवेल.”
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्यापूर्वी ब्रॉडकास्टर्स खुश, तब्बल ‘एवढ्या’ लाख लोकांनी पाहिला मेगा लिलाव
टीम इंडियाला धक्का! फॉर्ममध्ये असलेला फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२०तून बाहेर
हरमनप्रीतच्या झुंजार शतकी खेळीमुळे रोमांचक सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २ धावांनी विजय