‘धरमशालातील सामना दुपारी चारला खेळवा’, भारतीय दिग्गजाचा कारणासह सल्ला

'धरमशालातील सामना दुपारी चारला खेळवा', भारतीय दिग्गजाचा कारणासह सल्ला

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. हा सामना हिमाचल प्रदेशच्या धरमशालामध्ये खेळला गेला. मालिकेतील (India vs Sri Lanka, 2nd T20I) तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी याच ठिकाणावर खेळला जाणार आहे. हा सामना ठरल्याप्रमाणे सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. असे असले तरी, भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) या सामन्याच्या वेळेमुळे खुश नाही. जाफरच्या मते सामना दुपारी चार वाजताच सुरू व्हायला हवा होता.

सामना चार वाजता सुरू करण्यामागे जाफरने एक ठोस कारणही सांगितले आहे. धरमशालामधील तापमान सध्या सहा ते सात डिग्रीच्या आसपास आहे आणि याच कारणास्तव जाफरने सामन्याची वेळ चुकीची असल्याचे सांगितले आहे. त्याच्या मते सामना जसा-जसा पुढे खेळला जातो, थंडी वाढत असते. शक्यतो असे खूप कमी वेळा होते, जेव्हा भारत किंवा इतर कोणत्या संघाला अशाप्रकारच्या वातावरणात सामना खेळण्याची वेळ येते. याच पार्श्वभूमीवर वसीम जाफरने सामन्यांच्या वेळेवर निराशा व्यक्त केली आहे.

जाफरने एक खास ट्वीटर पोस्ट करून निराशा व्यक्त केली आहे. त्यानी पोस्टमध्ये लिहिले की, “असे वाटत आहे की, आत्तापासूनच त्याठिकाणी गोठवणारी थंडी आहे. पुढचा सामना चार वाजता सुरू होण्याविषयी तुम्ही काय विचार करता ? स्क्रीनवर त्याठिकाणचे फोटो दाखवले गेले. थंडी जास्त होण्याआधी सामना संपला पाहिजे. याचसोबत ड्यू फॅक्टरही कामी येत नाही.” दरम्यान, जाफरने हे ट्वीट शनिवारीचा (२६ फेब्रुवारी) दुसरा टी-२० सामना सुरू होण्यापूर्वी केले होते आणि तिसऱ्या सामन्याची वेळ बदलण्याविषयी चाहत्यांचे मत विचारले होते.

उभय संघातील टी-२० मिलकेचे पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले आहेत आणि २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्याचा विचार केला, तर श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी १८४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील सर्व सामने भारताने जिंकले होते. अता श्रीलंकेविरुद्धच्या शेवटचा टी-२० सामना जिंकून भारताकडे पुन्हा एकदा विरोधी संघाला क्लीन स्वीप देण्याची संधी आहे.

महत्वाच्या बातम्या –

टीम इंडियाच्या विजयाची गाडी सुसाट! श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२०मध्ये संघाच्या नावावर झाले ‘हे’ विक्रम

इशान किशन डोक्याला चेंडू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल, ‘अशी’ घडली हृदयाचा ठोका चुकवणारी घटना

केरला ब्लास्टर्सचा चेन्नईयन एफसीवर दणदणीत विजय; उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला राखले कायम

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.