भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) नुकतीच पार पडली. भारतीय संघाने मालिकेतील मोहाली येथे झालेला पहिला सामना १ डाव आणि २२२ धावांच्या फरकाने जिंकला होता. त्यानंतर बंगळुरू येथील दुसरा दिवस-रात्र कसोटी सामनाही भारतीय संघाच्या पारड्यात पडला. भारतीय संघाने २३८ धावांनी हा सामना जिंकला आहे. अशाप्रकारे भारताने २-० च्या फरकाने श्रीलंकेला व्हाईटवॉश (Whitewash To Sri Lanka) दिला आहे.
या विजयासह भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. तो भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनल्यापासून ही भारतीय संघाने विरोधील संघाला क्लिन स्वीप केलेली सलग पाचवी मालिका आहे. या खास उपलब्धीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफर (Wasim Jaffer) याने पुष्पाच्या अंदाजात कर्णधार रोहितचा हेतू (Captain Rohit’s Intension) स्पष्ट केला आहे.
रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकल्यात सलग ५ मालिका
टी२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी२० कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर रोहितने न्यूझीलंडविरुद्ध प्रथमच पूर्णवेळ कर्णधार म्हणून टी२० मालिकेत काम पाहिले. या मालिकेत भारतीय संघाने ३-० असा विजय त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाला आधी वनडे मालिकेत ३-० व त्यानंतर टी२० मालिकेत ३-० असे पराभूत केले.
श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेच्या पूर्वी झालेल्या तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने एकतर्फी यश मिळवत ३-० असा विजय साजरा केलेला. त्यानंतर आता या दोन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला पराजित करत, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग १४ सामने आपल्या नावे केले आहेत.
Since @ImRo45 became full time Captain:
3-0 vs NZ (T20I)
3-0 vs WI (ODI)
3-0 vs WI (T20I)
3-0 vs SL (T20I)
2-0 vs SL (Tests) #INDvSL pic.twitter.com/ojREzqlA6M— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 14, 2022
वसिम जाफरने स्पष्ट केला रोहितचा हेतू
रोहितच्या या प्रशंसनीय यश प्राप्तीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू वसिम जाफर यांनी वेगळ्या अंदाजात त्याचे कौतुक केले आहे. रोहितच्या आतापर्यंतच्या सर्व मालिका विजयांची आकडेवारी टाकत त्यांनी खाली पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनचा दाढीवरून हात फिरवताना फोटो जोडला आहे. त्या फोटोतील अल्लू अर्जुनला रोहित शर्माचे नाव देत त्यांनी त्यावर लिहिले आहे की, ‘मैं हारेगा नहीं साला.‘ म्हणजेच, मी कधीही हारणार नाही, हाच कर्णधार रोहितचा उद्देश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीचा श्रेयस अय्यरला सलाम, निवडले फेब्रुवारीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू; महिलांमध्ये ‘ही’ ठरली विजेती
ना धोनी, ना कोणी; केवळ ‘यष्टीरक्षक’ रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये साधलाय ‘तो’ पराक्रम
‘पंत’ बनले मालिकावीर! ‘या’ कारणांमुळे श्रेयस आणि बुमराह ऐवजी रिषभ पंत ठरला मालिकावीर