---Advertisement---

WI vs IND | वेस्ट इंडीजविरुद्ध मिळालेल्या यशाचे श्रेय आयपीएललाचं, वाचा शिखर धवन काय म्हणाला

On: सोमवार, जुलै 25, 2022 10:14 AM
Shikhar Dhawan vs WI
---Advertisement---

शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौऱ्यातील एकदिवसीय मालिका नावावर केली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यापाठोपाठ रविवारी (२४ जुलै) भारतीय संघाने दुसरा सामना २ विकेट्स राखून जिंकला. वेस्ट इंडीजमध्ये एकदिवसीय मालिकेत शिखर धवन पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत असून त्याने ही जबाबदारी चोखपणे पार पाडल्याचे दिसते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला मिळालेल्या विजयानंतर कर्धणार धवनने खेळाडूंच्या चांगल्या प्रदर्शनाचे श्रेय आयपीएलला दिले. 

भारतीय संघ सध्या मालिकेत ०-२ अशा विजयी आघाडीवर आहे. दुसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) खूपच आनंदी होता. तो म्हणाला की, “एका संघाच्या रूपात हे खूप चांगले प्रदर्श होते. संघातील खेळाडूंनी त्यांचा आत्मविश्वास गमावला नाही आणि हे अद्भुत आहे. श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल सर्वांनी कमाल केली. आवेश खाननेही पदार्पणाच्या सामन्यात संघासाठी महत्वाच्या ११ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त आयपीएलचे देखील धन्यवाद, जिथे खेळाडू मोठ्या मंचावर प्रदर्शन करतात आणि याचा फायदा संघाला होतो.”

धवन पुढे बोलताना म्हणाला की, “मला वाटते आम्ही चांगली गोलंदाजी केली आणि त्यांनीही चांगली सुरुवात केली होती. शाई होप आणि कर्णधार निकोलस पूरनने चांगली फलंदाजी केली. आम्ही विचार केला की, जर ते असे करू शकतात (३११ धावा करू शकतात) तर आम्हीही असे करू शकतो. आम्ही थोडी हळू सुरुवात केली, पण शुबमन गिलने (४३) उत्कृष्ट फलंदाजी केली. श्रेयस अय्यर (६३) आणि संजू सॅमसन (५४) यांच्या भागीदारीमुळे चांगलाच फरक पडला. संजू धावबाद झाला, पण असे होत असते. खेळाडू अजून शिकत आहेत आणि आपल्या सपोर्ट स्टाफचेही आभार मानतो, कारण ते जबरदस्त काम करत आहेत.”

वेस्ट इंडीजचा सलामीवीर फलंदाज शाई होपच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हा १०० वा सामना होता, ज्यामध्ये त्याने शतक ठोकले. धवनने देखील त्यांच्या १०० व्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले होते. याच पार्श्वभूमीवर धवनने होपला शुभेच्छा दिल्या आणि हा अनुभव खास असल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान, उभय संघातील सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर वेस्ट इंडीजने नाेणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी ६ विकेट्सच्या नुकसानावर ३११ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य ४९.४ षटकात आणि ८ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. शिखर धवन या सामन्यात कमाल करू शकला नाही. अवघ्या १६ धावांवर त्याने विकेट गमावली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

‘बापू’ तारी बॅटिंग कमाल छे! अक्षर पटेलच्या मॅच विनिंग षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अर्रर्र! वनडे मालिका जिंकूनही भारताच्या ताफ्यात निराशेची लहर, झालंय मोठं नुकसान

रेल्वेने मारला राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचा चौकार; महाराष्ट्र उपविजेता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---