भारत आणि वेस्ट (IND vs WI) इंडिज यांच्यामध्ये रविवारी (०६ फेब्रुवारी) गुजरात येथील अहमदाबाद येथे पहिला एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या( rohit sharma) नेतृत्वाखाली पहिल्यांदा गोलंदाजी केली. भारतीय संघाने या १००० व्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाला ६ विकेट्सने पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत ( rishabh pant) विचित्र पद्धतीने बाद झाल्याचे पाहायला मिळाले. काही काळ त्याला सुद्धा विश्वास बसत नव्हता की तो बाद झाला आहे. ही बाब थोडी मजेदार आणि थाडी दुख:द होती. पण यानंतर पंतला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
भारतीय संघ फलंदाजी करत आसताना १८ व्या षटकात हा प्रकार घडला आहे. यावेळी स्ट्राइकवर सूर्यकुमार यादव तर नाॅन स्ट्राइकवर रिषभ पंत होता आणि अल्झारी जोसेफ गोलंदाजी करत होता. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने स्ट्रेट ड्राइव्ह शाॅट मारला. त्याने मारलेला चेंडू जोसेफने पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो चेंडू पायाला न लागता विकेटवर जाऊन आदळला. यावेळी रिषभ पंत क्रिजच्या बाहेर होता. त्यामुळे पंत बाद झाला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
रिषभ पंतचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्याने ९ चेंडूत ११ धावा केल्या, त्यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता.
https://twitter.com/jennife74834570/status/1490316931899203592?s=20&t=rkty_5KTp0d58SfXGk_F0A
Unlucky dismissal of Pant, no prblm he looked fine in his inn.
If management trusts him to be No.4, he shd get atleast 20 inn. at 4
Constant shuffling is no use……! pic.twitter.com/4ixG3QLFMX
— Akram Khan (@AkramK2108) February 6, 2022
या सामन्यात फिरकी गोलंदाज वाॅशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल यांनी शानदार कामगिरी केली. या दोन गोलंदाजांनी मिळून ७ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करत वेस्ट इंडिज संघाला ४३.५ षटकांतच सर्वबाद करुन १७६ धावांवरच रोखले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या सलामी जोडीने ८४ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने अर्धशतक ठोकत ५१ चेंडूत ६० धावा केल्या. विराट कोहली ८ धावांवरच बाद झाला. इशान किशन २८ धावांवर तर रिषभ पंत ११ धावांवर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार आणि दीपक हुड्डाने डाव सावरत भारताला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारने ३६ चेंडूत ३४ तर दीपकने ३२ चेंडूत २६ धावा केल्या आणि भारताने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला.
आता या दोन संघांमधील एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना ९ फेब्रुवारीला तर तिसरा सामना ११ फेब्रुवारीला अहमदबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यानंतर या दोन संघात टी२० मालिका कोलकत्ता येथे पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चहल यंदा दिसणार मुंबई इंडियन्सकडून खेळताना? रोहितबरोबरच्या त्या व्हिडिओनंतर चर्चांना उधान
पहिल्या वनडेत फ्लॉप ठरूनही विराटची मोठ्या विक्रमाला गवसणी, मोडला सचिनचा ‘हा’ रेकॉर्ड