भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर १६ फेब्रुवारीपासून उभय संघातील टी-२० मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली गेली होती, आता टी-२० मालिका कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर खेळली जाणार आहे. मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली (Virat Kohli) ईडन गार्डनवर मोठी खेळी करेल अशी अपेक्षा सर्वांनाच आहे.
ईडन गार्डन हे असे स्टेडियम आहे, ज्याठिकाणी खराब फॉर्ममधील अनेक फलंदाज त्यांच्या चांगल्या फॉर्मममध्ये परतले आहेत. यामध्ये भारतासह विदेशातील फलंदाजांचाही समावेश आहे. भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि पाकिस्तानच्या यूनुस खान यांचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल. एकंदरित पाहता ईडन गार्डन खराब फॉर्ममधील फलंदाजांसाठी भाग्यशाली राहिले आहे.
मोहम्मद अजहरुद्दीनने दुसरीकडे चांगली फलंदाजी करो किंवा न करो, परंतु ईडन गार्डनमध्ये त्यांनी नेहमीच चांगले प्रदर्शन केले. त्यांनी या स्टेडियमवर एकूण ५ कसोटी शतके केली. तसेच लक्ष्मणनेही या मैदानावर पाच कसोटी शतके केली आहेत. या स्टेडियमवर लक्ष्मणने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. लक्ष्मणने ईडन गार्डनमध्ये २००१ साली ऑस्टेलियाविरुद्ध २८१ धावांची ऐतिहासिक खेळीही केली होती. अशात विराटही या मैदानात फॉर्ममध्ये पुनरागमन करू शकतो.
विराटने त्याचे शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटीत ठोकले होते. हा सामनाही ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला गेला होता. त्यानंतर विराटला अद्याप एकही शतक करता आलेले नाही. अशात वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटच्या शतकाचा दुष्काळ संपेल अशी शक्यता आहे.
तसे पाहिले, तर टी-२० सामन्यात शतक करणे सोपी गोष्ट नसते. परंतु, या स्टेडियमचा इतिहासत पाहता, याठिकाणी विराटसारखा अनुभवी फलंदाज नक्कीच ही कामगिरी करू शकतो. यापूर्वी रोहित शर्माने याच स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची खेळी केली होती. विराटचे या स्टेडियमवरील प्रदर्शन पाहता त्याने याठिकाणी आतापर्यंत २ कोसीट आणि १ एकदिवसीय शतक केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
याला म्हणतात वफादारी! ‘या’ ५ खेळाडूंनी कधीच दिला नाही संघमालकांच्या विश्वासाला तडा
Photo: वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकेत दोन हात करण्यास टीम इंडिया सज्ज! पंत सांभाळणार ‘उपकर्णधारपद’
दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या राहुलने गर्लफ्रेंड अथियासोबत शेअर केला ‘व्हॅलेंटाईन’, फोटो एकदा बघाच