---Advertisement---

IND vs WI: टीम इंडियाने जिंकला टॉस, ‘करो या मरो’ सामन्यात घेतला मोठा निर्णय; प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल?

On: रविवार, मार्च 1, 2026 6:53 PM
---Advertisement---

टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि वेस्ट इंडिज भिडणार आहेत. हा सामना केवळ विजयासाठीच नाही तर उपांत्य फेरीसाठीही निर्णायक ठरेल. आजचा सामना जो जिंकेल तो संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजी करेल. भारताने त्यांच्या प्लेइंग ११मध्ये कोणताही बदल केलेला नाही; भारत आज झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या संघासोबत खेळत आहे.

सुपर-८ फेरीत दोन्ही संघांचे प्रत्येकी २ गुण आहेत, त्यामुळे आजचा सामना निर्णायक आहे. जिंकणारा संघ ४ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता, तर झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकला होता. त्यामुळे आजचा सामना पूर्णपणे ‘करा किंवा मरा’ असा आहे.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

वेस्ट इंडीज: शाई होप (कर्णधार/यष्टीरक्षक), रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोती, शामर जोसेफ

भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---