---Advertisement---

शुभमंगल सावधान! अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो

On: गुरूवार, जानेवारी 28, 2021 10:30 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर बुधवारी(२७ जानेवारी) विवाहबंधनात अडकला आहे. त्याने वैशाली विश्वेश्वरन बरोबर बुधवारी कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने लग्न केले. विजयने मागीवर्षी ऑगस्टमध्ये वैशालीबरोबर साखरपुडा केला होता.

विजयला आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याच्या लग्नातील फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. विजय हैदराबादकडून आयपीएलमध्ये खेळतो. हैदराबादने शुभेच्छा देताना लिहिले आहे की ‘आम्ही विजय शंकरला त्याच्या आयुष्यातील खास दिवसाबद्दल शुभेच्छा देतो. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी रहावे, अशा शुभेच्छा.

विजय शंकर हा २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. पण त्याला विश्वचषकादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याला अर्ध्यातच विश्वचषकातून बाहेर जावे लागले होते.

त्याने भारतीय संघाकडून १८ जानेवाीरी २०१८ ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने १२ वनडे सामने खेळले. यात त्याने २२३ धावा केल्या आणि ४ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने २०१८ सालीच मे महिन्यात श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना १०१ धावा केल्या आणि ५ विकेट्स घेतल्या.

तो भारताकडून शेवटचा सामना २०१९ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध मँचेस्टर येथे खेळला.

विजय देशांतर्गत क्रिकेट तमिळनाडूकडून खेळतो. त्याने नुकताच १० जानेवारीला झारखंड विरुद्ध सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीचा सामना खेळला. या सामन्यात त्याने ४ धावा केल्या.

तसेच विजयने आयपीएलमध्ये ४० सामने खेळले असून यात त्याने ६५४ धावा केल्या असून ६ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय संघांमध्येच रंगणार सामने

टीम इंडिया थँक्यू! ‘हा’ फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार

सौरव गांगुलीच्या झाल्या अनेक चाचण्या; हॉस्पिटलने दिले प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---