भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज केएल राहुल सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुल संघाचे नेतृत्व करणार होता, पण दुखापतीमुळे त्याला मालिकेतील एकही सामना खेळता आला नाही. आगामी इंग्लंड दौऱ्यातून देखील याच कारणास्तव त्याने माघार घेतली आहे. ग्रोइनच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी राहुल जर्मनीला गेला असून चाहते त्याला काही कारणास्तव ट्रोल करू लागले आहेत.
अथिया शेट्टीमुळे केएल राहुल होतोय ट्रोल
उपचारासाठी जर्मनीला गेल्यानंतर केएल राहुलने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून दोन फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये राहुलने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळी जिन्स परिधान केली आहे. त्याने चाहत्यांकडे प्रार्थना मागितल्या आहेत. अनेक चाहत्यांनी त्याच्या फिटनेससाठी प्रार्थाना केल्या. पण काहीजण आहेत, ज्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
Count your blessings. 🙏 pic.twitter.com/2cIBvlvzar
— K L Rahul (@klrahul) June 20, 2022
एका नेटकऱ्याने लिहिले की, दुखापत एक कारण आहे, सुनील शेट्टीच्या मुलीला फिरवायचे आहे. नेटकऱ्याच्या प्रत्युत्तरावर अनेकांनी लाईक्स दिल्या आहेत. एकंदरीत पाहता अनेकांना असे वाटत आहे की, राहुल सध्या जर्मनीमध्ये अथिया शेट्टी (Athiya Shetty) सोबत मजा करत आहे. पण राहुल जर्मनीमध्ये एकटा गेला आहे की, अथिया त्याच्यासोबत आहे, याविषयी अद्याप कसलीही माहिती समोर आली नाहीये.
केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाच्या जर्सीमध्ये यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात दिसला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या या एकदिवसीय मालिकेतील राहुल भारताचा कर्णधार होता. मालिकेतील एकही सामना भारताला जिंकता आला नव्हता. त्यानंतर राहुलने आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, पण यावर्षी देखील तो स्वतःच्या संघाला विजेतपद मिळवून देऊ शकला नाही.
केएल राहुल जर वेळीच दुखापतीतून सावरला नाही, तर आगामी काळात होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही खेळू शकणार नाही. जर राहुल वेळीच दुखापतीतून सावरला नाही, तर विश्वचषक संघात इशान किशन भारताच्या डावाची सुरुवात करू शकतो. इशान किशन आणि रोहित शर्माने आयपीएलसह भारतीय संघासाठी देखील यापूर्वी डावाची सुरुवात केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी२०चा दांडगा अनुभव अन् दमदार फॉर्म असूनही ‘या’ खेळाडूला टी२० विश्वचषकात नाही मिळणार जागा