---Advertisement---

“रिषभ पंत भविष्यातील स्टार”, भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकांनी केली मुक्तकंठाने प्रशंसा

---Advertisement---

भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील रिषभ पंतच्या कामगिरीने अतिशय प्रभावित झाले आहेत. राठोड यांच्या मते आगामी काळात रिषभ पंत भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची भूमिका निभावेल. रिषभ पंत एक असामान्य खेळाडू आहे, असेही मत त्यांनी मांडले. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“पंतसाठी मागील वर्ष होते अतिशय कठीण”

या मुलाखतीत बोलताना राठोड यांनी मागील वर्ष कोरोना विषाणूमुळे रिषभ पंतसाठी कठीण गेले, असे म्हंटले. मागील वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामन्यांचे वेळापत्रक कोरोना विषाणूमुळेच कोलमडले होते. अशा परिस्थितीत पंतला फारशा संधी मिळाल्या नाहीत. मात्र यावेळी मिळालेल्या संधींचा त्याने अचूक फायदा उठवला, असेही यावेळी राठोड यांनी सांगितले.

ते म्हणाले, “मागील वर्ष त्याच्यासाठी अतिशय कठीण होते. परंतु तो कठोर मेहनत घेत होता. कठोर सराव करत होता. तो ज्या दिवशी त्याचा खेळ बहरतो, त्यादिवशी तो संघाला सामना जिंकवून देतो, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मागील दोन सामन्यात त्याने हे सिद्धही केले आहे.”

इंग्लंडविरुद्ध कोणाला मिळणार संधी?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ऐतिहासिक कामगिरीनंतर आता भारतीय संघ मायदेशात इंग्लंडच्या संघाशी दोन हात करायला तयार आहे. या मालिकेत यष्टीरक्षकाच्या स्थानी वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत, यापैकी कोणाला संधी मिळणार, याची आता चर्चा आहे. विक्रम राठोड यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, “पंत डावखुरा फलंदाज असल्याने संघाला त्याचा मोठा फायदा आहे. परंतु साहा आणि पंत, यांच्यात कोणाला संधी मिळणार, याचा निर्णय सामन्याच्या दिवशीच घेतला जाईल.”

दरम्यान, भारत आणि इंग्लंडच्या मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ चेन्नईत दाखल झाले असून २ फेब्रुवारीपासून ते सरावाला सुरुवात करतील. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आपापल्या मागील मालिकेत विजय मिळवला असल्याने ही मालिका देखील रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या:

म्हणून जॉनी बेयरस्टोला विश्रांती देण्याचा निर्णय योग्य, इंग्लंडच्या प्रशिक्षकाने सांगितले कारण  

पदार्पणाच्या सामन्यातच पाकिस्तानच्या या फिरकीपटूचा धुमाकूळ; ७१ वर्षांनंतर केलाय मोठा कारनामा

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी माजी खेळाडूने निवडला भारताचा संभाव्य संघ, मोहम्मद सिराजला मात्र स्थान नाही

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---