डॉमिनिका कसोटी सामना भारताने 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. यासह भारतीय संघाने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 14 जुलै) वेस्ट इंडिज संघाने 130 धावांवरच नांग्या टाकल्या. त्यामुळे भारताने सहजरीत्या पहिला सामना आपल्या नावावर केला. या सामन्यात भारतीय दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन चमकला. त्याने पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावात विकेट्सचे पंचक पूर्ण करत खास विक्रम आपल्या नावावर केले. एका विक्रमात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा भारतीय ठरला.
दुसऱ्या डावात विंडीज 130 धावांवर सर्वबाद
वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही खास प्रदर्शन केले नाही. त्यांच्याकडे रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या फिरकीचे उत्तरच नव्हते. विंडीजकडून एकट्या ऍलिक अथानाजे याने सर्वाधिक 28 धावांची खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज खास खेळी करू शकला नाही. यादरम्यान आर अश्विन (R Ashwin) फिरकीचे जाळे टाकत राहिला आणि माशाप्रमाणे यजमानांचा एकापाठोपाठ एक असे 7 फलंदाज त्यात अडकत गेले. दुसऱ्या डावात अश्विनने 21.3 षटके गोलंदाजी करत एकूण 71 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 7 विकेट्स चटकावल्या. तसेच, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने 2 आणि मोहम्मद सिराज याला 1 विकेट घेता आली. अश्विनने 7 विकेट्स पूर्ण करताच खास विक्रम नोंदवला.
आर अश्विनचे विक्रम
या 7 विकेट्ससह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनच्या 709 विकेट्स पूर्ण (Ashwin’s 709 wickets in international cricket) झाल्या. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. या यादीत अव्वलस्थानी भारतीय दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याचा समावेश आहे. त्याच्या नावावर 953 विकेट्सची नोंद आहे. तसेच, यादीत तिसऱ्या स्थानी हरभजन सिंग असून त्याने कारकीर्दीत 707 विकेट्स घेतल्या होत्या.
याव्यतिरिक्त अश्विनचा दुसरा विक्रम असा की, त्याने त्याने तब्बल 34 वेळा एका कसोटी डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. परदेशात खेळताना हे अश्विनचे कोणत्याही कसोटी डावातील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले. या सामन्याच्या पहिल्या डावातही अश्विनने पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याने सामन्यात 131 धावा खर्चून 12 विकेट्स घेतल्या. परदेशात कोणत्याही कसोटीत हे अश्विनचे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. यासोबतच हे एखाद्या भारतीय गोलंदाजाचे परदेशातील तिसरे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले.
2nd 5-wicket haul in the ongoing Test 👍
34th 5-wicket haul in Test 👌
8th 10-wicket haul in Tests 👏
Well done, R Ashwin 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/FWI05P4Bnd #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/u9dy3t0TAd
— BCCI (@BCCI) July 14, 2023
अश्विनचा तिसरा विक्रम म्हणजे, त्याने 8 वेळा कोणत्याही कसोटीत 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. भारतीय गोलंदाजांमध्ये अशी अश्विनपूर्वी कुंबळेने अशी कामगिरी केली होती. आता दोघेही 8 वेळा अशी कामगिरी करत बरोबरीवर आहेत. अश्विनकडे आता कुंबळेच्याही पुढे जाण्याची संधी आहे. याव्यतिरिक्त अश्विनचा चौथा विक्रम म्हणजे, त्याने सहा वेळा वेस्ट इंडिजविरुद्ध एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. (india beat west indies in dominica test match by innings and 141 runs ravichandran ashwin made special records read)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय
953- अनिल कुंबळे
709- आर अश्विन*
707- हरभजन सिंग
कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स
11- मुथय्या मुरलीधरन
8- रंगना हेरथ
6- सिडनी बार्न्स
6- आर अश्विन*
भारत वि. वेस्ट इंडिज कसोटीत सर्वाधिक विकेट्स
89- कपिल देव
76- माल्कम मार्शल
74- अनिल कुंबले
72- आर अश्विन*
68 – श्रीनिवास वेंकटराघवन
भारत वि. वेस्ट इंडिज कसोटीत सर्वाधिक 5 विकेट्स हॉल
6- माल्कम मार्शल
6- आर अश्विन*
5- हरभजन सिंग
महत्वाच्या बातम्या-
अश्विन-यशस्वीच्या वादळात वेस्ट इंडिज उद्ध्वस्त! Team Indiaचा 1 डाव आणि 141 धावांनी दणदणीत विजय
BREAKING: एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा! ऋतुराज करणार नेतृत्व, पाहा संपूर्ण संघ