विश्वचषक 2023 चा सध्या थरार सुरु आहे. विश्चषकातील 12 वा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी (14 ऑक्टोबर) खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. परंतु प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ मोठी धावसंख्या करण्यात सपशेल अपयशी ठरला. पाकिस्तानचा सर्व संघ 42.5 षटकांत 191 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारताकडून बुमराह,सिराज, पंड्या, कुलदीप आणि जडेजा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
या सामन्यात भारताने पाकिस्तानला दोनशेच्या आत ऑलआउट करत एक मोठा विक्रम रचला आहे. विश्वचषकात विरोधी संघाला सर्वाधिक वेळा दोनशे धावांच्या आत सर्वबाद करणाऱ्या संघांच्या यादीत भारत पहिल्या स्थानी पोहचला आहे. भारताने आतापर्यंत 26 संघांना विश्वचषकात दोनशेच्या आत सर्वबाद केले आहे. तर दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया संघ आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 23 वेळा विरोधी संघांना दोनशेच्या आत सर्वबाद केले आहे. तर तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड संघ आहे. त्यांनी आतापर्यंत 21 वेळा विरोधी संघाला सर्वबाद केले आहे.
विश्वचषकात विरोधी संघाला सर्वाधिक वेळा 200 धावांच्या आतमध्ये बाद करणारे संघ
भारत – 26.
ऑस्ट्रेलिया – 23.
न्यूझीलंड – 21.
तत्पूर्वी, भारताने विश्वचषक 2023 मध्ये दोन सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने रोहितसेनेने नावावर देखील केले. पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सने, तर दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 8 विकेट्सने जिंकला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने भारताकडून सर्वाधिक 131 धावा केल्या होत्या.
भारताचा तिसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी नरेंद्र मोदी स्टेडिअम अहमदाबाद येथे होत आहे. तर भारताचा विश्वचषकातील चौथा सामना बांगलादेशविरुद्ध 19 ऑक्टोबरला पुणे येथे होणार आहे. विश्वचषक 2023 भारतात होत असल्यामुळे भारताने विश्वचषक जिंकावा अशी सर्व भारतीयांना अपेक्षा आहे. (India became the first country to achieve such a world record in the match against Pakistan)
महत्वाच्या बातम्या –
सिक्स हिटिंग मशिन शर्मा जी! तुफानी अर्धशतकासह वनडेत ठोकली षटकारांची ‘ट्रिपल सेंच्युरी’
इंग्लंड सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील, अफगाणिस्तानचे पहिल्या विजयावर लक्ष