निवृत्त खेळाडूंच्या लिजेंड्स लीग क्रिकेटचा अंतिम सामना जयपूर येथे खेळला गेला. गौतम गंभीरच्या नेतृत्वातील इंडिया कॅपिटल्स संघाने इरफान पठाणच्या नेतृत्वातील भिलवाडा किंग्स संघावर 104 धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात आक्रमक फलंदाजी करणारा रॉस टेलर सामनावीर ठरला.
A huge win for @CapitalsIndia to clinch the #LLCT20 trophy!#BossLogonKaGame #LegendsLeagueCricket pic.twitter.com/hQHtmtcC3k
— Legends League Cricket (@llct20) October 5, 2022
जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भिलवाडा किंग्सचा कर्णधार इरफान पठाणने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सुरुवातीला योग्य ठरला. त्यांचे पहिले चार गडी केवळ 21 धावांवर तंबूत परतला. मात्र, त्यानंतर आलेल्या रॉस टेलरने बढती दिलेल्या मिचेल जॉन्सनसह प्रतिआक्रमण केले. त्यांनी अवघ्या दहा षटकात 126 धावांची भागीदारी केली. टेलरने अक्षरशः विरोधी गोलंदाजांवर तुटून पडत 41 चेंडूवर 4 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 82 धावा तडकावल्या. जॉन्सननेही 35 चेंडूत 62 धावा कुटल्या. ते दोघे बाद झाल्यानंतर आलेल्या ऍश्ले नर्सने अवघ्या 19 चेंडूवर 42 धावांचा तडाखा दिला. या सर्वांच्या खेळामुळे इंडिया कॅपिटल्सने 211 धावांचा डोंगर उभा केला.
भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भिलवाडा किंग्सचा डाव उभा राहिलाच नाही. शेन वॉटसन (27) व जसल करिया (22) यांनाच केवळ 20 धावांच्या पुढे जाता आले. 18.2 षटकात भिलवाडा किंग्सचा डाव 107 धावांवर संपुष्टात आला. कॅपिटल्ससाठी पवन सुयाल, प्रविण तांबे व पंकज सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. अंतिम सामन्याचा मानकरी रॉस टेलर तर स्पर्धेचा मानकरी भिलवाडा किंग्सचा युसुफ पठाण ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने दाखवली किशोरदांच्या बंगल्यात बनवलेल्या रेस्टॉरंटची झलक, व्हिडिओ पाहिला का?
एकच मारला, पण कच्चून मारला! पंजाबच्या पठ्ठ्याने भिरकावला 108 मीटरचा गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडिओ