वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची बुधवारी (२७ जुलै) समाप्ती झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे वारंवार कमी षटकांच्या कमी होत गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने ११९ धावांनी दणदणीत विजय मिळवत यजमान संघाला क्लीन स्वीप दिला. या सामन्यात नाबाद ९८ धावांची खेळी करणारा तसेच संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण खेळ दाखवणारा भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल मालिकावीर ठरला.
3-0 👏👏👏
One happy bunch 😎#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/3EM6drcMtp
— BCCI (@BCCI) July 27, 2022
पोर्ट ऑफ स्पेन येथील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्वतः शिखरने शुबमन गिलसह वेस्ट इंडीजची गोलंदाजी फोडून काढण्यास सुरुवात केली. दोघांनी भारताला ११३ धावांची सलामी दिली. धवन ५८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर काही वेळातच पावसाचे आगमन झाले. त्यावेळी भारतीय संघाने २४ षटकात १ बाद १२४ धावा केल्या होत्या. जवळपास दीड तासांचा खेळ वाया गेल्यानंतर सामना प्रत्येकी ४० षटकांचा केला गेला. पुन्हा सामना सुरू झाल्यावर श्रेयस अय्यर व शुबमन गिल यांनी वेगाने धावा काढण्यावर भर दिला. अय्यरने ४४ धावा बनविल्या. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. भारतीय संघाच्या डावातील ३६ षटके झाली असताना पुन्हा पाऊस आला व भारताचा डाव थांबविला गेला. आपल्या पहिल्या शतकाच्या प्रतिक्षेत असलेला गिल दुर्दैविरित्या ९८ धावांवर नाबाद राहिला.
गोलंदाजीतही भारत सव्वाशेर
यजमानांना सामना जिंकण्यासाठी डकवर्थ लुईस नियमानुसार ३६ षटकात २६० धावांचे आव्हान मिळाले. पुन्हा पाऊस आल्याने ते तितक्यात षटकात २५७ असे सुधारले गेले. मात्र, याचा भारतीय गोलंदाजांवर कोणताच परिणाम झाला आहे. दीपक हुडाने पहिले षटक निर्धाव टाकल्यानंतर मोहम्मद सिराजने दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मायर्सची दांडी वाकवली. तसेच तिसऱ्या चेंडूवर ब्रुक्सला बाद करत वेस्ट इंडीजची हालत २ बाद ०० अशी केली. इथून पुढे वेस्ट इंडीजच्या डावाला आकार मिळालाच नाही व त्यांचे गडी नियमित अंतराने बाद होत गेले. किंग व कर्णधार पूरन यांनी प्रत्येकी ४२ धावांचे योगदान दिले व वेस्ट इंडिजचा डाव १३७ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून चहलने चार तर सिराज व शार्दुल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. शुबमन गिलला सामनावीर व मालिकावीर या दोन्ही पुरस्काराने सन्मानित केले गेले. या विजयासह वेस्ट इंडिजला त्यांच्याच मायदेशात पराभूत करणारा पहिला भारतीय कर्णधार होण्याचा मान शिखर धवन याने मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हा माजी भारतीय क्रिकेटर म्हणतोय,”सात-सात तास वनडे क्रिकेट कोण पाहणार?”
प्रेग्नेंसीनंतर ‘ही’ भारतीय महिला क्रिकेटर परतणार मैदानावर, बनणार पहिलीच क्रिकेटर