भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test) सुरू आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरूपात (Day-Night Test) खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीत संघर्ष करताना दिसला. मात्र, गोलंदाजांनी लक्षवेधी कामगिरी करत पहिल्या दिवसावर भारतीय संघाची छाप सोडली.
फलंदाजांची हाराकिरी
मोहाली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघ या सामन्यात एका बदलासह मैदानात उतरला. जयंत यादव याच्या जागी अक्षर पटेल याला संधी देण्यात आली. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय साफ चुकीचा ठरला. स्वतः रोहितसह आघाडीचे चार फलंदाज केवळ ८६ धावांवर माघारी परतले. त्यानंतर रिषभ पंतने २६ चेंडूत ३९ धावांची वेगवान खेळी केली. आपला केवळ चौथा सामना खेळणार्या श्रेयस अय्यरने ९७ चेंडूंवर ९२ धावांची तुफानी खेळी साकारली. तळाचे फलंदाज जास्त तग धरू न शकल्याने भारतीय संघाचा डाव २५२ धावांवर आटोपला. श्रीलंकेचे दोन्ही फिरकीपटू लसिथ एम्बुलडेनिया व प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले.
गोलंदाजांनी उध्वस्त केला श्रीलंकेचा डाव
भारताला रोखल्यानंतर श्रीलंका या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या मनात वेगळेच काहीतरी होते. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी अवघ्या १४ धावांमध्ये श्रीलंकेचे पहिले तीन फलंदाज गारद केले. २८ धावांवर त्यांचा चौथा गडी बाद झाला. अर्धशतक होता होता अक्षरने असलंकाला बाद केले. डिकवेला व मॅथ्यूज दिवसाखेर नाबाद राहणार असे वाटत असताना, बुमराहने मॅथ्यूजला बाद केले. भारतीय संघासाठी उपकर्णधार बुमराहने तीन तर शमीने दोन बळी मिळवले.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधी दिसला हार्दिक पांड्याचा नवा अवतार, बनला ‘बॉम्ब एक्सपर्ट’ (mahasports.in)