भारत आणि पाकिस्तान या दोन संघातील क्रिकेट सामने नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. विशएश म्हमजे दोन्ही देशात सुरू असलेल्या वादांमुळे हे दोन्ही संघ द्विपक्षीय क्रिकेट सामने खेळत नाही. त्यामुळे दोन्ही संघात होणारे रोमांचक सामने पाहण्यासाठी क्रिकेटचाहत्यांना मोठी प्रतिक्षा करावी लागते. मात्र, यंदा अगदी आठवड्याभरात भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांना घिडण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
आशिया चषक 2022 मधील सर्व लीग सामने संपल्यानंतर आता सुपर 4 सामन्यांना सुरुवात झाली आहे. या सुपर 4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ समोरासमोर आले आहेत. मात्र, या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला होता. आशिया चषकातील दुसऱ्या लीग सामन्यात पाकिस्तान विरुद्ध हार्दिक पंड्याच्या खांद्याला खांदा लाऊन विशेष कामगिरी करणारा अष्टपैलू रविंद्र जडेजाला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर गेला आहे. आता त्याच्या जागी पाकिस्तान विरुद्धचा बहुचर्चीत सामना खेळण्याची संधी कोणाला मिळणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता या प्रश्नाचे उत्तर सर्वांना मिळाले आहे. जडेजाच्या जागी संघात फिरकीपटू रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे.
याशिवाय भारताने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज आवेश खान आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिक या दोघांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यांच्या जागी संघात रिषभ पंत आणि दीपक हुड्डा यांचा समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
साधेभोळे राहुल द्रविड S**y शब्द उच्चारायला लाजले! पत्रकार परिषदेतील व्हिडिओ तुफान व्हायरल
‘भारत डरपोक, शारजाहमध्ये खेळायला घाबरते’; महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानमधून इंडियावर आरोप
‘आम्ही पाकिस्तानची खूप धुलाई…’, कट्टर विरोधकांशी पुन्हा भिडण्यापूर्वी राहुल द्रविडने घेतली फिरकी