भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना बुधवार, 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय सघांने मोठी धावसंख्या करून देखील त्यांना विजय मिळवता आला नव्हता. तर मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे अर्ध्यातून रद्द केला गेला. अशात तिसरा सामना जिंकणे भारतासाठी महत्वाचे बनले आहे. भारताने जर हा सामना गमावला, तर एका नकोश्या विक्रमाची नोंद त्यांच्या नावावर होणार आहे.
भारतीय संघा न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 0-1 अशा पिछाडीवर आहे. 1981 नंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या सगल दोन एकदिवसीय मालिका गमावल्या नाहीत. भारताने या मालिकेतील शेवटचा सामना जिंकला, जो बुधवारी खेळला जाणार आहे. तर संघ त्याचा विक्रम अबाधित ठेऊ शकेल. भारताने न्यूझीलंडविरुद्धची शेवटची एकदिवसीय मालिका 2020 मध्ये खेलला होती आणि 0-3 असा पराभव स्वीकारला होता. अशात बुधवारी जर संघ पराभूत झाला, तर हा भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरा एकदिवसीय मालिका पराभव असेल.
माजी दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या नेतृत्वात भारताने 1881 न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारला होता. दोन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकते भारत 0-2 अशा अंतराने पराभूत झाला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने मात्र 140 धावांवर समाधान मानले. तसेच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 57 धावांनी विजय मिळवला होता. या मालिकेआधीही भारताने न्यूझीलंडकडून 0-2 असा पराभव स्वीकरला होता.
दरम्यान, भारतीय संघाच्या या न्यूझीलंड दौऱ्याचा एकंदरीत विचार केला, हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात टी-20 मालिकेत भारताने 1-0 अशा विजय मिळवला. तर एकदिवसीय मालिकेत मात्र शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ 1-0 अशा अंतराने मागे आहे. उभय संघांतील तिसरा एकदिवसीय सामना निर्णायक अशून भारतीय संघ विजयासाठी सर्व प्रयत्न करताना दिसेल. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मागच्या सामन्यात महागात पडला होता, पण शेवटचा सामन्यात त्याचे प्रदर्शन सुधारण्याच्या अपेक्षा वर्तवल्या जात आहेत. (India have not lost two consecutive ODI series against New Zealand since 1981)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला आयपीएलही भरणार बीसीसीआयची तिजोरी! तब्बल इतक्या कोटींना विकला जाणार एक संघ
एक वेळ नोकरीसाठी पसरत होता हात; आता बनणार टीम इंडियाचा सिलेक्टर?