विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी शनिवारी (दि. 30 सप्टेंबर) भारत विरुद्ध इंग्लंड संघात सराव सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी 1.30 वाजता उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, हे अधिकृत सामने नसणार आहेत.
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळवले जात आहेत. यातील चौथ्या सामन्यात भारत विरुद्ध इंग्लंड संघ एकमेकांना भिडणार आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही संघांची अलीकडील कामगिरी पाहिली, तर भारतीय संघाने नुकताच आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब जिंकला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 सामन्यांची वनडे मालिकाही भारताने 2-1ने खिशात घातली आहे. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.
याव्यतिरिक्त इंग्लंड संघाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी अलीकडेच आयर्लंडचा दौरा केला होता. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तसेच, दुसरा सामना इंग्लंडने जिंकला होता. तसेच, तिसऱ्या सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता.
सराव सामन्यासाठी उभय संघ
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
इंग्लंड-
डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, सॅम करन, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, रीस टोपले, मार्क वूड (India have won the toss and have opted to bat against england)
हेही वाचा-
सराव सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने-सामने, टॉस जिंकून रोहितने घेतली बॅटिंग; पाहा संघ
रोहितच्या विस्फोटक फलंदाजीची ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या मनात दहशत, म्हणाला, ‘तो तुमच्याविरुद्ध 20-24…’