भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली मागच्या जवळपास अडीच वर्षांपासून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये एकही शतक करू शकला नाहीये. चाहते विराटच्या शतकी खेळीची मागच्या मोठ्या काळापासून वाट पाहत आहेत, पण त्यांची इच्छा अद्याप पूर्ण झाली नाहीये. इंग्लंड दौऱ्यात विराटच्या शतकाचा दुष्काळ संपेल अशी, अनेकांना अपेक्षा आहे. परंतु भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक मात्र विराटच्या शतकाच्या प्रतिक्षेत नाहीत.
मागच्या मोठ्या काळापासून विराट कोहली (Virat Kohli) शतक करू शकला नाहीये, त्यामुळे त्याच्यावर नेहमीच टीका होत आली आहे. विराटने या काळात शतक जरी केले नसले, तरी अनेकदा अर्धशतक आणि सामना जिंकवण्यासाठी महत्वाची ठरेल, अशी खेळी नक्कीच केली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या मते विराट विराटने शतक केले नाही तरी चालेल.
विराटवर टीका करणाऱ्यांना द्रविडने चोख उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, “मी तुमच्या त्या गोष्टीशी सहमत नाहीये की, तो ३० वर्ष पूर्ण झाल्यानंतर चुकीच्या दिशेने गेला आहे. मी आतापर्यंत जेवढ्याना पाहिले, त्यापैकी सर्वात कष्टाळू विराटच आहे. सराव सामन्यात तो ज्या पद्धतीने खेळला, ते पाहता तो प्रत्येक रखाण्यात बरोबरची टीक करत चालला होता.”
“प्रत्येक खेळाडू अशा काळातून जात असतो. विराट देखील यातून गेला आहे. ही वेळ तीन आकड्यांवर लक्ष केंद्रित करण्याची करण्याची नाहीये. लोक शतकाकडे यशाच्या दृष्टीने पाहतात, पण आपल्याला विजयात भागीदारी हवी आहे. विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये अनेकांना प्रेरित करतो.”
दरम्यान, विराटने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या डे नाईट कसोटी सामन्यात शेवटचे शतक केले होते. त्यानंतर आता जवळपास अडीच वर्ष झाले, पण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये विराटला शतक करता आले नाहीये.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी निवडलेला भारतीय संघ –
जसप्रीत बुमराह (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल,रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा., मोहम्मद सिराज, उमेश यादव.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
SL vs AUS | दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होण्याआधीच स्टेडियममध्ये मोठा अपघात, पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियन फिरकीपटूनेच अखेर केली शेन वॉर्नची बरोबरी, वाचा काय आहे अनोखा विक्रम