भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथील तिसरा कसोटी सामना नुकताच अनिर्णित अवस्थेत संपला. या सामन्यानंतर आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारत व तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड मध्ये केवळ 0.2 टक्क्यांचा फरक आहे. हे जाणून घेणे गरजेचे आहे की या क्रमवारीतील टॉप दोन संघात विजेतेपदासाठी अंतिम सामना खेळला जाणार आहे.
कोरोना मुळे बऱ्याच क्रिकेट मालिका रद्द झाल्याने टेस्ट चॅम्पियनशिप साठी एकूण गुणांऐवजी गुणांच्या टक्केवारीला महत्त्व देणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतीय संघाचे ऑस्ट्रेलिया पेक्षा अधिक गुण असून देखील टक्केवारी कमी असल्याने ते क्रमांक दोनवर आहेत.
4 मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गुणांची टक्केवारी 73.8 इतकी असून ते प्रथम क्रमांकावर आहेत. यानंतर भारत पाच मालिकांमध्ये 70.2 इतक्या टक्केवारीने दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंड पाच मालिकांमध्ये 70 टक्क्याने तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारत व न्यूझीलंड मधील फरक अतिशय कमी असून भारताला आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात व इंग्लंड विरुद्ध मायभूमीत होणाऱ्या कसोटी मालिकेत विजय आवश्यक आहेत.
टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीतील टॉप 2 मध्ये असलेले संघ विजेतेपदासाठी इंग्लंड येथे सामना खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट प्रेमींना आशा असेल की भारतीय संघ आगामी सामन्यात उत्तम कामगिरी करत क्रमवारीतील टॉप दोन मधील आपले स्थान टिकवून ठेवेल.
महत्वाच्या बातम्या:
टीम इंडियाला मोठा धक्का! बॉर्डर-गावसकर मालिकेतून आणखी एक खेळाडू बाहेर
शर्यतीचा खेळ पडला महागात! पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकच्या कारचा अपघात
रिकी पॉंटिंगची तिखट प्रतिक्रिया, म्हणाला भारतीय संघ ब्रिस्बेनला न जाण्याची कारणे शोधत आहे