टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारचा (३० जुलै) दिवस भारतासाठी आनंदाचाच म्हणावा लागेल. कारण भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि बॉक्सर लवलीना बोरगोहेन या दोन महिला खेळाडू उपांत्य सामन्यात यश मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. अशातच आता हॉकी खेळातूनही आनंदाची बातमी समोर येत आहे. पुरुष हॉकी स्पर्धेत भारत आणि जपान संघात पूल एमधील सामना पार पडला. हा सामना भारताने ५-३ ने खिशात घातला. उपांत्यपूर्व सामन्यापूर्वी हा विजय भारतासाठी मनोबल वाढवणारा विजय मानला जात आहे.
या सामन्यात पहिल्या क्वार्टरच्या १३ व्या मिनिटाला भारताकडून हरमनप्रीत सिंगने पहिला गोल केला होता. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये गुर्जंत सिंगने २ मिनिटांनंतर म्हणजेच सामन्याच्या १७ व्या मिनिटाला शानदार गोल केला. तरीही दुसऱ्या मिनिटानंतरच जपानचा मिडफिल्डर तनाका केंटाने मैदानी गोल करत आघाडी कमी करत २-१ असा स्कोर केला होता. केंटाचा हा टोकियो ऑलिंपिकमधील ५ वा गोल आहे. (India men’s hockey team defeat Japan 5-3)
#TeamIndia finish the pool stage with another thumping win over Japan.
India, how's the josh? 🇮🇳#JPNvIND #HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/WWzAYgzwNY
— Hockey India (@TheHockeyIndia) July 30, 2021
त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये खूपच आक्रमक खेळ पाहायला मिळाला. जपानने सुरुवातीचे दोन मिनिटे भारतावर दबाव बनवला आणि याचा परिणाम ३ मिनिटांनंतरच वाटानाबे कोटाच्या गोलने सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. मात्र, भारतीय संघानेही डाव सावरत पुढच्याच मिनिटाला नीळकंठ शर्माच्या पासवर शमशेर सिंगने स्कोर ३-२ असा केला.
सामन्याच्या चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने जपानविरुद्ध आणखी आघाडी घेत ४-२ असा स्कोर केला. भारतासाठी नीळकंठने सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला शानदार गोल करत ही आघाडी घेतली. यानंतर भारतीय संघाने जपान संघावर आणखी एक गोल केला आणि सामन्यात ५-२ अशी आघाडी घेतली. गुर्जंत सिंगने सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर ५ वा गोल केला. या सामन्यातील गुर्जंतचा हा दुसरा गोल आहे. तरीही शेवटच्या क्षणी जपानच्या मुराटा कझुमाने शानदार गोल करत भारताची आघाडी कमी केली. मात्र, हा सामना भारताने आपल्या नावावर केला.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना