भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना आॅस्ट्रेलियाने जिंकल्याने मालिकेत बरोबरी झाली आहे.
आता तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या कसोटीसाठी भारतीय संघ मेलबर्नला पोहचला आहे. पण भारतीय संघ रविवार पर्यंत विश्रांती घेणार असून त्यानंतर तीन दिवस मेलबर्न कसोटीसाठी सराव करणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने हा निर्णय खेळाडूंशी चर्चा करुन घेतला असल्याचे मुंबई मिररनुसार वृत्त आहे.
भारतीय संघ या कसोटी मालिकेत चार सामने खेळणार असल्याने त्याचे वेळापत्रक हे व्यस्त आहे. त्यामुळे खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे.
याबद्दल अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर शास्त्री म्हटले होते की, ‘त्यांना सरावाआधी विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांनी मैदानावर येऊन हजेरी लावाली आणि परत हॉटेलमध्ये जावे. आम्हाला माहित आहे की पर्थची खेळपट्टी वेगवान आहे. तिथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल.’
आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात अष्टपैलू हार्दिक पंड्याचा आणि मयंक अगरवालचा समावेश करण्यात आला आहे. मयंकला दुखापतग्रस्त पृथ्वी शॉ ऐवजी संधी मिळाली आहे.
शॉला कसोटी मालिका सुरु होण्याआधीच सराव सामन्यात झेल घेण्याच्या प्रयत्नात घोट्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–अमेरिकेतील त्या चाहत्याने चक्क गाडीच्या नंबर प्लेटवरच लिहले धोनीचे नाव…
–पर्थ खेळपट्टीवरुन भारत-आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच झुंपली भांडणे
–कोहली-कुंबळे वादाबद्दल भारताच्या या दिग्गज खेळाडूने केला मोठा खूलासा