महिला आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेस लवकरच सुरूवात होणार आहे. बांगलादेश यजमान असलेल्या या स्पर्धेचा पहिला सामना एक ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. हा सामना बांगलादेश विरुद्ध थायलंड यांच्यात खेळला जाणार असून त्याच दिवशी भारताचा संंघही श्रीलंकेशी भिडणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी समोरा-समोर येणार आहेत. महिला आशिया चषकाचा हा आठवा हंगाम आहे.
पहिला महिला आशिया चषक 2004मध्ये श्रीलंकेत खेळला गेला. 2018पर्यंत नियमितपणे हे स्पर्धा खेळवली गेली, मात्र 2020 आणि 2021मध्ये कोरोनामध्ये ही स्पर्धा रद्द झाली. आता ही पुन्हा सुरू झाली असून क्रिकेटविश्वात याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 7 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.
दोन आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, यूएई, थायलंड व मलेशिया असे एकूण ७ संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल. अव्वल 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. याचा अंंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. 2012मध्ये ही स्पर्धा टी20 स्वरूपाची खेळली गेली. तसेच 2012च्या हंगामात आठ संघ खेळत असल्याने त्याचे दोन गटात विभागणी करण्यात आली. मात्र मागील दोन हंगामापासून या स्पर्धेत (2016 आणि 2018) कमी संघ असल्याने राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात आहे.
भारत आतापर्यंत सहा वेळा आशिया चषकाचा मानकरी ठरला आहे, तर बांगलादेशने मागील हंगाम जिंकत पहिल्यांदा स्पर्धेते विजेतेपद पटकावले. यावर्षी या स्पर्धेचे सर्व सामने सिलहट इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम आणि सिलहट आउटर क्रिकेट स्टेडियम येथे खेळले जाणार आहेत.
या स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळल्यानंतर, हरमनप्रीत कौरचा संघ 3 ऑक्टोबरला मलेशियाशी आणि 4 ऑक्टोबरला यूएईशी सामना करेल. अखेरच्या दोन सामन्यात भारतीय संघ 8 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध आणि त्यानंतर 10 ऑक्टोबरला थायलंडविरुद्ध मैदानात उतरेल.
या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण टीव्ही चॅनेल स्टार स्पोर्ट्स आणि डिज्नी हॉटस्टार ऍपवर होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजता खेळला जाणार आहे.
आशिया चषकासाठी भारतीय महिला संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, स्नेह राणा, डी हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, गायकवाड, राधा यादव, किरण नवगिरे.
राखीव खेळाडू- तानिया भाटिया व सिमरन दिलबहादूर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: नवीन चेंडूने अर्शदीपचा कहर, स्वत:च सांगितले भन्नाट गोलंदाजीचे रहस्य
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलची स्लो खेळी ठरली ऐतिहासिक, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय






