आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 साठी सोमवारी (12 सप्टेंबर) बीसीसीआयने संघ घोषित केला. विश्वचषकापूर्वी भारताला मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघासोबत टी-20 मालिका खेळायच्या आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीमुळे संघातू नबाहेर होता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघात पुनरागमन करत आहे. तसेच दीपक हुड्डा याला पहिल्यांदाच एखाद्या आयसीसी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.
टी-२० विश्वचषकासाठी निवडला गेलाला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
टी-२० विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ आणि त्याआधी खेळल्या जाणाऱ्या या दोन टी-20 मालिकांसाठी निवडेलल्या संघात तसे पाहिले, तर फार काही फरक नाहीये. भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडला गेला आहे, तर टी-20 विश्वचषकात शमीला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले आहे. अशीच परिस्थिती वेगवान गोलंदाज दीपक चाहरची देखील आहे. दिग्गज रविचंद्रन अश्विला टी-20 संघात निवडले गेले आहे, तर रवी बिश्नोईला मात्र विस्वचषकादरम्यान राखील खेळाडूंमध्ये ठेवले गेले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग: टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
सिकंदर रझाने रचला इतिहास! बनला आयसीसीचा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा पहिला झिम्बाब्वेयन
पुन्हा एकदा बजबॉल ठरले यशस्वी! तीन दिवसांत इंग्लंडने आफ्रिकेला पराभूत करत मालिका टाकली खिशात