पुढीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी (Under 19 World Cup) सोमवारी (2 डिसेंबर) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
या विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंपैकी काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मोठा संघर्ष केला आहे. या संघात स्थान मिळवलेल्या अनेक मुलांचे पालक शेतकरी, सैनिक, गवळी, शिक्षक, ड्रायव्हर, कंडक्टर अशा विविध क्षेत्रात काम करत आहेत.
या खेळाडूंबद्दल थोडक्यात माहिती –
प्रियम गर्ग –
19 वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून निवड झालेला प्रियम गर्ग (Priyam Garg) हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्याचे वडील नरेश हे सायकलवर दूध विकायचे आणि मुलाच्या खेळासाठी पैशांची व्यवस्था करायचे.
ते आता आरोग्य विभागात ड्रायव्हर आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रियमने दुहेरी शतक आणि ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये शतक केले आहे. तसेच त्याने मागील महिन्यात झालेल्या देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया सी कडून खेळताना अंतिम सामन्यात 74 धावांची खेळीही केली होती. तसेच तो उत्तर प्रदेशकडून रणजी ट्रॉफीतही खेळला असून त्याने 2018-2019 च्या मोसमात 814 धावा केल्या होत्या.
यशस्वी जयस्वाल –
विश्वचषकासाठी 19 वर्षांखालील भारतीय संघात निवड झालेल्या यशस्वी जयस्वालने क्रिकेट खेळण्यासाठी पाणीपुरीची गाडीही चालवली आहे. यशस्वी वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न घेऊन एकटा उत्तर प्रदेशमधील भदोहीहून मुंबईत आला होता.
त्याच्या घरची परिस्थिती हालाकीची असूनही वडील त्याला पैसे पाठवायचे मात्र तेवढे पैसे त्याला पुरत नव्हते. त्यासाठी त्याला पाणीपुरीचा गाडाही चालवावा लागला. पण त्यानेही जिद्द न सोडता चांगली कामगिरी करत सर्वांना त्याची दखल घ्यायला लावली.
आकाश सिंग –
वेगवान गोलंदाज आकाश सिंग हा राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील नगला रामरतन गावातल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. सध्या तो बंगळुरू येथे प्रशिक्षण घेत आहे. आकाश राहुल द्रविडची (Rahul Dravid) भेटला आहे. द्रविडने आकाशचा पाहिल्यानंतर सराव करत रहा, असा सल्ला दिला होता.
आकाशनेही सराव करताना कोणतीही तडजोड केली नाही. तो झहीर खान (Zahir Khan) आणि आशिष नेहरा (Ashish Nehra) यांना आपले आदर्श मानतो.
ध्रुव चंद जुरेल –
19 वर्षाखालील क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ध्रुव चंद जुरेलचे (Dhruva Chand Jurel) वडील नाम सिंग 1999 मध्ये कारगिल युद्धात लढले होते. सैन्यात हवालदारच्या पदावरुन निवृत्त झालेल्या नेम सिंग यांना आपल्या मुलाला सैनिक बनवायचे होते. पण ध्रुवने क्रिकेटची निवड केली.
त्याला 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपदही देण्यात आले होते. ध्रुवने क्रिकेटची आपली तयारी मजबूत करण्यासाठी ग्रेटर नोएडा वेस्ट येथे यंदाच्या 12वी ची बोर्ड परीक्षाही दिली नाही.
रवी बिश्नोई –
19वर्षाखालील क्रिकेट संघात फिरकीपटू म्हणून निवडलेल्या रवी बिश्नोईचे (Ravi Bishnoi) वडील मांगीलाल हे शिक्षक आहेत. परंतु, रवीला शिक्षणापेक्षाही क्रिकेटची गोडी अधिक लागली.
12वी उत्तीर्ण झालेला रवी जोधपूरच्या स्पार्टन क्रिकेट अकादमीमध्ये 8 वर्षांपूर्वी वेगवान गोलंदाज होण्यासाठी दाखल झाला. तेथील प्रशिक्षक प्रत्युष आणि शाहरुखने त्याला फिरकीपटू होण्यास प्रेरित केले.
ज्यावेळी भारताचा संघ जाहीर करण्यात आला त्यावेळी रवी फिटनेस कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेत होता.
सुशांत मिश्रा –
रांचीमधील पुदांग येथे राहणाऱ्या सुशांत मिश्राचे (Sushant Mishra) वडील समीर हे बिहारमधील दरभंगा येथील मुळ रहिवासी आहेत. ते सेल्सचे काम करतात. एकदा आयपीएल खेळण्यासाठी रांचीच्या जेएससीए क्रिकेट स्टेडियमवर पोहोचलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने सुशांतला काय करतो असे विचारले होते आणि तो म्हणाला होता की मी गोलंदाज आहे.
त्यानंतर तो गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर पोहोचला. त्यावेळी त्याने भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूवर रैनाने षटकार ठोकला, पण दुसऱ्या चेंडूवर सुशांतने रैनाला त्रिफळाचीत केले होते.
सुशांत हा डीएव्ही पुदांग येथे बारावीचे शिक्षण घेत आहे.
कुमार कुशग्रा –
-जमशेदपूरचा रहिवासी कुमार कुशग्रा (Kumar Kushagra) हा यष्टिरक्षक आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे. कुशाग्रचे वडील शशिकांत हे जमशेदपूरच्या ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑफ कॉमर्स विभागात वाणिज्य विभागात सहाय्यक आयुक्त आहेत.
कुशाग्रशिवाय त्याच्या घरी दोन बहिणी आहेत. कुशाग्रने वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
सध्या तो जमशेदपूर लोयला शाळेत विद्यार्थी आहे. कुशग्रा 2015-16 दरम्यान 14 वर्षाखालील क्रिकेट खेळला होता. त्याचवेळी त्याची 16 वर्षाखालील क्रिकेट संघातही निवड झाली होती.
19 वर्षाखालील विश्वचषकासाठी असा आहे भारतीय संघ-
प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव चंद जुरेल (उप-कर्णधार/यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे़, रवि बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.
२०१९ विश्वचषकात दाखवलेल्या खिलाडूवृत्तीसाठी न्यूझीलंडला मिळाला हा मोठा पुरस्कार
वाचा????https://t.co/TxCm3B6FZd????
#म #मराठी #cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 4, 2019
"बुमराह माझ्यासाठी बेबी बॉलर", पाकिस्तानच्या या क्रिकेटपटूने केले मोठे भाष्य
वाचा ????https://t.co/tzKkgGOeKV????#म #मराठी #cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia #JaspritBumrah— Maha Sports (@Maha_Sports) December 4, 2019