कॅनबेरा। भारतीय संघाच्या सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेची नुकतीच बुधवारी सांगता झाली. या मालिकेनंतर आता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेत ३ सामने होणार आहेत. हे सामने ६ ते ८ डिसेंबरदरम्यान होतील.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टी२० मालिका
या मालिकेसाठी बीसीसीआयने ऑक्टोबरच्या अखेरीसच १६ जणांचा भारतीय संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर रोहित शर्माच्या अनुपस्थित केएल राहुल उपकर्णधारपद सांभाळेल. रोहितला आयपीएल २०२० दरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही.
तो सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या दुखापतीवर काम करत आहे. त्यामुळे वनडे मालिकेप्रमाणे टी२० मालिकाही भारतीय संघाला रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळावी लागणार आहे.
फलंदाजांची फळी
या मालिकेसाठी भारतीय संघात विराट, केएल राहुलसह शिखर धवन, मयंक अगरवाल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे आणि संजू सॅमसन हे फलंदाज आहेत. तसेच यष्टीरक्षक म्हणून केएल राहुल आणि सॅमसन हे दोन पर्याय भारताकडे आहेत.
गोलंदाजांची फळी –
युजवेंद्र चहल हा फिरकीपटू, तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दिपक चाहर आणि टी नटराजन या वेगवान गोलंदाजांचा भारताच्या गोलंदाजी फळीत समावेश आहे.
या मालिकेसाठी नटराजनची प्रामुख्याने निवड करण्यात आली नव्हती. मात्र या संघात संधी मिळालेला वरुण चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाल्याने नटराजनचा संघात समावेश करण्यात आला. जर नटराजनला या टी२० मालिकेत खेळण्याची संधी मिळाली तर हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी२०मधील पदार्पण ठरु शकते. त्याने बुधवारी वनडे पदार्पण केले आहे. तसेच वनडे पदार्पणात २ विकेट्स घेत सर्वांना प्रभावितही केले आहे.
अष्टपैलू खेळाडू –
या टी२० मालिकेसाठी भारताकडे हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांचा पर्याय आहे. वनडे मालिकेत पंड्या आणि जडेजा या दोघांनीही त्यांच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अगरवाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषक सुपर लीगमध्ये ऑस्ट्रेलियाची अव्वल स्थानी झेप, तर टीम इंडिया ‘या’ क्रमांकावर
भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे ‘संपूर्ण वेळापत्रक’; पाहा कधी आणि कुठे होणार सामने
अखेर चहलची ‘सिग्नेचर पोझ’ रवींद्र जडेजालाही करावीच लागली, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव