---Advertisement---

भारताच्या मालिका 4 अन् कर्णधार फक्त 3, पाहा कुणाच्या खांद्यावर पडली अधिक जबाबदारी

On: सोमवार, ऑक्टोबर 31, 2022 8:56 PM
Rohit-Sharma-And-Hardik-Pandya-And-Shikhar-Dhawan
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत भारताचे तीन सामने पार पडले आहेत. यातील दोन सामने भारताने जिंकले असून तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. अशात बीसीसीआयने भारतीय संघाच्या न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्याची घोषणा केली आहे. या दौऱ्यांमुळे भारताचे पुढील दोन महिने खूपच व्यस्त असणार आहेत. या दौऱ्यात भारताला 4 मालिका खेळायच्या आहेत. मात्र, या चार मालिकांसाठी 3 कर्णधारांची निवड करण्यात आलीये. अशात कुणावर सर्वाधिक जबाबदारी पडलीये जाणून घेऊया…

सर्वाधिक जबाबदारी कोणत्या कर्णधारावर?
बीसीसीआयने न्यूझीलंड दौऱ्यावरील 3 टी20 आणि 3 वनडे मालिकेसाठी भारताच्या दोन संघांची घोषणा केली आहे. यातील टी20 संघाची जबाबदारी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या खांद्यावर सोपवली आहे. तसेच, वनडे मालिकेचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याला बनवले आहे.

याव्यतिरिक्त बांगलादेश दौऱ्यातील 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधार म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) याला निवडले आहे. रोहितने न्यूझीलंड मालिकेतून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौरा संपल्यानंतर रोहित डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार/ यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, यश दयाल.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बूम बूम बुमराहचा पत्ता कट! टी20 विश्वचषकानंतर आता ‘या’ चार मालिकांनाही मुकणार
हार्दिक पंड्या पुन्हा बनला भारताचा कर्णधार, स्वतः बीसीसीआयने सोपवलीये जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---