---Advertisement---

होय, आम्ही स्लेजिंग करणार! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे भारतीय संघाला खुले आव्हान

---Advertisement---

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या वनडे मालिकेने दौऱ्याचा शुभारंभ होईल. दोन्ही संघातील खेळाडू सरावादरम्यान चांगलाच घाम गाळत आहेत. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक जस्टीन लॅंगरने आगामी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ मर्यादेच्या बाहेर न जाता चौकटीत राहून स्लेजिंग करणार असल्याचे म्हटले आहे.

पूर्वीचे खेळाडू करायचे सातत्याने स्लेजिंग

ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी विजयासाठी कोणत्याही स्तराला जाण्यासाठी ओळखला जायचा. मैदानांवर प्रतिस्पर्धी खेळाडूंना उकसवण्याचे काम ऑस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडू करत.

ऑस्ट्रेलियन संघाच्या या भूतकाळाविषयी सांगताना लॅंगर म्हणाला, “ऑस्ट्रेलियात खेळताना तुमच्यावर अधिक दबाव असतो, असे म्हटले जाते. यामागे कारण हे प्रत्यक्ष सामन्यावेळी होणारी थोडीशी बातचीत आहे. पूर्वी संघात शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, ॲडम गिलख्रिस्ट, रिकी पॉंटिंग यांच्यासारखे खेळाडू मैदानावर आपल्या मजेशीर अंदाजात स्लेजिंग करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या या वर्तनामागे काही चुकीची भावना नसायची. सामना स्पर्धात्मक वातावरणात खेळला जावा, यासाठीही थोडीफार मजा चालायची.”

आम्ही स्लेजिंग करणार ! लॅंगरने सांगितली ऑस्ट्रेलियाची रणनीती

खेळाडू म्हणून खेळताना लॅंगर अनेकदा स्लेजिंग करताना दिसला होता. वर्तमान संघाच्या वर्तणूकीविषयी बोलताना तो म्हणाला, “आम्ही मैदानावर दुर्व्यवहार करणार नाही आणि खपवूनही घेणार नाही. खेळ कायम चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न व्हायला हवा. मात्र, भारतीय खेळाडू आमच्या खेळाडूंकडून थोड्याफार स्लेजिंगची अपेक्षा नक्कीच करू शकतात. मात्र, त्यामध्ये, मजामस्ती आणि खिलाडूवृत्ती दिसून येईल. आमच्या खेळाडूंच्या मैदानावरील व मैदानाबाहेरील वागणुकीत मागील काही वर्षात बराच फरक पडला आहे.”

टीम पेन विनोदी व्यक्ती आहे

लॅंगर यांनी आपले म्हणणे पुढे नेताना म्हटले, “आमचा कसोटी कर्णधार टिम पेन हा अत्यंत विनोदी स्वभावाचा आहे. मागील दौऱ्यात याचा प्रत्यय सर्वांना आला होता. विराट कोहली मैदानावर ज्याप्रकारे वावरत असतो ती गोष्टही आम्हाला खूप आवडते. थोडीफार आक्रमकता नक्कीच असायला हवी. मी पुन्हा एकदा सांगू शकतो की, दबाव हा मैदानावर घडणार्‍या इतर घटनांमधून नाहीतर, आपण कोणाविरुद्ध आणि कसे खेळतोय यामुळे येत असतो.”

मर्यादित षटकांच्या मालिका संपल्यानंतर उभय संघ १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ खेळतील. भारताचा कर्णधार विराट कोहली हा फक्त पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. मालिकेतील उर्वरित सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करताना दिसेल. भारत ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’चा गतविजेता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

जसप्रीत बुमराह देतोय युवा कार्तिक त्यागीला गोलंदाजीचे धडे, पाहा फोटो 

पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या मागची साडेसाती थांबेना, न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

KBC मध्ये ७ कोटी रुपयांसाठी विचारला क्रिकेटबद्दल अवघड प्रश्न, वाचा काय आहे उत्तर?

ट्रेंडिंग लेख 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारे ३ भारतीय फलंदाज; धोनीचाही समावेश

या पाच सामन्यात भारतीय अष्टपैलू खेळाडूंनी गाजवली होती ऑस्ट्रेलियाची मैदाने

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टी२०त सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता दाखवणारे टीम इंडियाचे ३ गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---