भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून यामध्ये १ ते ५ जुलै दरम्यान एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. एजबस्टन स्टेडियम बर्मिंंघम येथे हा सामना खेळला जाणार आहे. मागील वर्षी कोरोनानुळे भारतीय संघाला दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले होते. त्या मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना आहे. त्यावेळी भारतीय संघाच्या नेतृत्वाची कमान विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर होती. त्याने कर्णधारपद सोडले असून भारतीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा आहे. विराट सध्या कर्णधार नसला तरी त्याचे संघातील महत्व अधिक हे एका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून दिसून येत आहे.
या व्हिडिओमध्ये विराट कर्णधार असल्याचा भास होत आहे. या दौऱ्यात भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला एक जबाबदारी दिली आहे. त्याने सरावानंतर ज्याप्रमाणे खेळाडूंशी संवाद साधला आहे त्यावरून तो अजूनही संघाचा कर्णधारच आहे ही जाणीव होते. लिसेस्टरशायरने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेयर केला आहे.
लिसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी विराट कोहली संघाचे मनोबल वाढवताना, असे कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये तो महत्वाच्या सूचना सांगत असताना बाकी खेळांडूबरोबर द्रविडही तेथे उपस्थित असलेले दिसत आहेत.
Game mode = 𝒂𝒄𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒆𝒅 💪@imVkohli gives a 𝗽𝗮𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝗮𝘁𝗲 team talk ahead of a busy day of preparations before @BCCI's Tour Match 🆚 @leicsccc.
🦊 #IndiaTourMatch | #LEIvIND pic.twitter.com/zDxP53Slxd
— Leicestershire CCC 🏏 (@leicsccc) June 21, 2022
महत्वाच्या आणि एकमेव कसोटी सामन्याआधी भारत लिसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. हा सामना २३ ते २७ जूनला लिसेस्टर येथे खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाने सरावाला सुरूवात केली आहे.
या कसोटी सामन्यांनतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा पहिलाच विदेशी कसोटी सामान ठरणार आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे. हा सामना भारताने जिंकला किंवा अनिर्णीत ठेवला तर भारताला कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. असे झाले तर, भारत प्रथमच इंग्लंडमध्ये पाच कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचेल.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारताचा अंतिम अकरा जणांचा संघ खालील खेळाडूंमधून निवडला जाईल,
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन (संभाव्यता)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठवणीतील सामना: तीन वर्षांपूर्वी शमीने हॅट्रिक घेत संपविला होता ३२ वर्षाचा दुष्काळ