युएई आणि ओमानमध्ये येत्या १७ ऑक्टोबर पासून टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये १७ डिसेंबर पासून कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक गुरुवारी (९ सप्टेंबर) जाहीर करण्यात आले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेला १७ डिसेंबर पासून प्रारंभ होणार असून, २६ जानेवारीला दौऱ्यातील शेवटचा सामना पार पडणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. ही कसोटी मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ स्पर्धेच्या अंतर्गत पार पडणार आहे.
यानंतर ११ जानेवारी पासून दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. तसेच शेवटी १९ ते २६ जानेवारी पर्यंत दोन्ही संघांमध्ये चार टी-२० मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी म्हटले की, “भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला आणि तिसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये पार पडणार आहेत. तर २६ डिसेंबर पासून सुरू होणारा दुसरा कसोटी सामना सेंचुरियनमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर होणारे टी -२० आणि वनडे मालिकेतील सामने केपटाऊन आणि पार्ल सिटीमध्ये पार पडतील.”
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा दौरा २०१७-१८ मध्ये केला होता. त्यावेळी भारतीय संघाला कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. ज्यामुळे ही मालिका रोमांचक होऊ शकते. दरम्यान कसोटी मालिकेत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकन संघाला वनडे आणि टी-२० मालिकेत पराभूत केले होते.(India tour of South Africa, click here to know the full schedule)
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
कसोटी मालिका
१)पहिला कसोटी सामना – १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२१, जोहान्सबर्ग
२)दुसरा कसोटी सामना – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२१, सेंच्युरियन
३)तिसरा कसोटी सामना – ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०२२,जोहान्सबर्ग
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – ११ जानेवारी २०२२, पार्ल
२)दुसरा वनडे समन -१४ जानेवारी २०२२,केपटाऊन
३)तिसरा वनडे सामना -१६ जानेवारी २०२२,केपटाऊन
टी-२० मालिका
१)पहिला टी -२० सामना – १९ जानेवारी २०२२,केपटाऊन
२) दुसरा टी-२० सामना – २१ जानेवारी,२०२२,केपटाऊन
३)तिसरा टी -२० सामना – २३ जानेवारी,२०२२, पार्ल
४)चौथा टी -२० सामना -२६ जानेवारी,२०२२, पार्ल
महत्त्वाच्या बातम्या –
सातत्याने निशाणा साधणाऱ्या गंभीरनेच धोनीला मेंटर करण्याच्या निर्णयाला दिला पाठिंबा, म्हणाला…
असे ५ खेळाडू, ज्यांनी २०१४ आणि २०१६ नंतर २०२१ च्या टी२० विश्वचषकासाठीही मिळवले टीम इंडियात स्थान