कोरोना या साथीच्या आजारामुळे मिळालेल्या विश्रांतीमुळे भारतीय क्रिकेट संघाने मागील 7 महिन्यांपासून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र दीर्घकाळानंतर 27 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा हा पहिला सामना असेल.
वनडे मालिकेतील दुसरा सामना 29 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल, तर तिसरा सामना 2 डिसेंबरला होईल. त्यानंतर टी20 मालिकेला सुरुवात होईल.
तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना 4 डिसेंबर रोजी खेळला जाईल, तर दुसरा सामना 6 डिसेंबरला होईल. त्यानंतर या मालिकेचा अंतिम सामना 8 डिसेंबरला होईल.
मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर दोन्ही संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याला 17 डिसेंबरपासून सुरुवात होईल. हा कसोटी सामना दिवस-रात्र असणार आहे. त्यामुळे हा भारतीय संघाचा परदेशातील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असेल. या सामन्यानंतर दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबर तर तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीला सुरु होईल. या मालिकेचा शेवटचा कसोटी सामन्याला 15 जानेवारीपासून सुरुवात होईल.
वनडे मालिकेचे वेळापत्रक :
पहिला वनडे – 27 नोव्हेंबर, सिडनी, सकाळी 9:10 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरा वनडे- 29 नोव्हेंबर, सिडनी, सकाळी 9:10 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरा वनडे- 02 डिसेंबर, कॅनबेरा, सकाळी 9:10 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
टी20 मालिकेचे वेळापत्रक :
पहिला टी20 – 04 डिसेंबर कॅनबेरा, दुपारी 1:40 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरा टी20 – 06 डिसेंबर, सिडनी, दुपारी 1:40 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरा टी20 – 08 डिसेंबर, सिडनी, दुपारी 1:40 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
कसोटी मालिकेचे वेळापत्रक :
पहिला कसोटी सामना – 17-21 डिसेंबर, ऍडिलेड, सकाळी 9:30 वाजता (दिवस- रात्र) (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरा कसोटी सामना – 26-30 डिसेंबर, मेलबर्न, पहाटे 5 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरा कसोटी सामना – 7-11 जानेवारी, सिडनी, पहाटे 5 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
चौथा कसोटी सामना – 15-19 जानेवारी, ब्रिस्बेन, पहाटे 5 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघ :
टी20 आंतरराष्ट्रीय संघ: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अगरवाल , केएल राहुल(उपकर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी. नटराजन.
वनडे संघः विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल(उपकर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, मयंक अगरवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
कसोटी संघ: विराट कोहली (कर्णधार)(पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतात होणार इंग्लंड विरुद्ध क्रिकेट मालिका; पाहा कधी होणार सामने
‘गती वाढवण्यासाठी मला ड्रग्ज घेण्यास सांगितले होते’, ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अख्तरचा मोठा खुलासा
धोनीच्या फार्म हाऊसमधील टोमॅटो आणि दुधाची विक्री झाली सुरू; किंमती घ्या जाणून
ट्रेंडिंग लेख –
अविस्मरणीय! भारतीय चाहते कधीही विसरू न शकणार नाहीत अशा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ३ खेळी
वनडे मालिकेत ‘या’ तिघांना बसावे लागू शकते बाकावर; गिलचाही समावेश
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडणारे ३ भारतीय गोलंदाज