भारताविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच पहिल्या टी-२० सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या दुखापतीचं स्वरूप पाहता उर्वरित मालिकेला तो मुकण्याची शक्यता आहे. शनिवारी (५ डिसेंबर) स्कॅनचा रिपोर्ट आल्यानंतर फिंचच्या दुखापतीबाबत अधिक स्पष्टता येईल. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलियन संघाने फिरकीपटू नॅथन लायनचा संघात समावेश केला आहे.
…तर मॅथ्यू वेड असेल कर्णधार
ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचला पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. दुसर्या डावात फलंदाजी करताना देखील फिंचला दुखापतीमुळे वेदना होत असल्याचे दिसून आले होते. सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया देतानाही त्याने पूर्णतः तंदुरुस्त नसल्याचे सांगितले होते. अशावेळी जर फिंच पुढील दोन सामने खेळू शकला नाही, तर यष्टीरक्षक मॅथ्यू वेडला कर्णधार केले जाईल. ऑस्ट्रेलियन संघाने नियमित उपकर्णधार पॅट कमिन्सला कसोटी मालिकेच्या दृष्टीने विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मागे दुखापतींचा ससेमिरा
ऑस्ट्रेलियन संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे. वनडे मालिकेदरम्यान डेविड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनिस यांना दुखापत झाली होती. डावखुरा फिरकी गोलंदाज ऍश्टन एगर देखील दुखापतीमुळे टी-२० मालिकेतून बाहेर गेला आहे. त्यातच आता कर्णधारालाच दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलियन संघाची डोकेदुखी वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”
‘…तर तुम्ही कन्कशन सब्स्टिट्यूट घेण्यास पात्र नाही’, भारतीय दिग्गजाची नव्या नियमावर नाराजी
ट्रेंडिंग लेख-
‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?
पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण






