---Advertisement---

IND vs AUS: रोहित बाहेर, या अष्टपैलू खेळाडूचे पदार्पण, पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग 11

On: शुक्रवार, जानेवारी 3, 2025 7:28 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना आजपासून म्हणजेच 3 जानेवारीपासून सिडनी येथे सुरू झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 4 सामन्यांनंतर 1-2 ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियासाठी ही कसोटी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटी सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती. मिचेल मार्शच्या जागी 31 वर्षीय स्टार अष्टपैलू ब्यू वेबस्टरचा प्रथमच प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे ब्यू वेबस्टरला भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत मुख्य प्रशिक्षकाने एक दिवसापूर्वी मोठा खुलासा केला होता. त्याने सांगितले की आकाश दीप पाठीच्या दुखापतीमुळे सिडनी कसोटी खेळू शकणार नाही. तसेच रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळत नाहीये. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. सिडनी कसोटीत कर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकल्यानंतर हा मोठा खुलासा केला आहे. भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. रोहितच्या जागी शुबमन गिल प्लेईंग इलेव्हनमध्ये तर आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णा खेळला आहे. ऑस्ट्रेलियन संघात एक बदल करण्यात आला आहे. मिचेल मार्शच्या जागी ब्यू वेबस्टर आला आहे.

दोन्ही संघांचे प्लेईंग इलेव्हन

भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन: सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज

हेही वाचा-

बीसीसीआयमध्ये जय शाह यांची जागा कोण घेणार? सचिवपदाच्या शर्यतीत हे नाव आघाडीवर
शुबमन गिलसह भारताचे चार क्रिकेटपटू अडचणीत, होऊ शकते अटक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ कधी जाहीर होणार? निश्चित तारीख जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---