कॅनबेरा। बुधवारी(२ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील ३ वनडे सामन्यांची मालिका संपली. ही मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात टी२० मालिका होणार आहे. या टी२० मालिकेत ३ सामने होणार आहेत. हे सामने ६ ते ८ डिसेंबरदरम्यान होतील.
ही मालिका होण्याआधी आपण या दोन संघात खेळल्या गेल्या टी२० सामन्यांच्या खास आकडेवारीबद्दल जाणून घेऊ –
-भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आत्तापर्यंत २० टी२० सामने झाले आहेत. यातील ११ सामने भारताने जिंकले असून ८ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तसेच १ सामन्याचा निकाल लागलेला नाही.
– भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आत्तापर्यंत ८ द्विपक्षीय टी२० मालिका झाल्या आहेत. त्यातील ३ मालिका भारताने जिंकल्या आहे, तर २ मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. तसेच ३ मालिका अनिर्णित सुटल्या आहेत.
– या दोन संघात शेवटची टी२० मालिका फेब्रुवारी २०१९ ला झाली होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.
– आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या आहेत. त्याने ५८४ धावा ऑस्ट्रेलियाविरुद्ध केल्या आहेत.
– आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये भारताकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विकेट्स जसप्रीत बुमराहने घेतल्या आहेत. त्याने १५ विकेट्स ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतल्या आहेत.
– ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा ऍरॉन फिंचने केले असून त्याने ४०५ धावा केल्या आहेत.
– ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक विकेट्स शेन वॉट्सनने घेतल्या आहेत. त्याने १० विकेट्स भारताविरुद्ध घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ऍलेक्स कॅरेच्या रनआऊटमध्ये माझी चूक’, ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाची कबुली
NZvsWI: दिवसाअखेर न्यूझीलंड २ बाद २४३; विलियम्सन ९७ धावांवर नाबाद