मोहम्मद कैफचे पृथ्वी शॉच्या फलंदाजीला समर्थन; ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी दिला होता ‘हा’ सल्ला

India vs Australia Mohammad Kaif Revealed The He Gave Prithvi Shaw Before Going To Australia Tour

भारतीय क्रिकेट संघाला ऍडलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सपशेल फ्लॉप ठरला. त्याच्यावर अनेकांनी टीका केली. परंतु आता माजी खेळाडू मोहम्मद कैफने त्याच्या फलंदाजीचे समर्थन केले आहे. सोबतच त्याला ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी दिलेल्या सल्ल्याचा खुलासाही केला आहे.

“तुमच्या फलंदाजीचे तंत्र निश्चितच चांगले चेंडू खेळण्यात तुमची मदत करतात. भारतात तुम्हाला अशा चेंडूंचा सामना करावा लागत नाही, जो पृथ्वी शॉ याला मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्याविरुद्ध खेळावा लागत आहे. ऑस्ट्रेलियाचे हे गोलंदाज जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहेत, जे १४५ किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करतात,” असे मोहम्मद कैफ म्हणाला.

शॉ याचे समर्थन करताना कैफ म्हणाला की, “गुलाबी चेंडूने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना खेळण्याची शॉ याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे समस्या येणे हे निश्चित आहे.”

आयपीएलदरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या कैफने सांगितलेे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याने शॉ याला सल्ला दिला होता.

आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर दिला होता सल्ला
“आयपीएलचा अंतिम सामना झाला, तेव्हा मी त्याला माझ्या जवळ बोलावले. त्याला म्हटले की, ज्यावेळी तुम्ही धावा करत असता, तेव्हा तुम्ही नेट्समध्ये कमी वेळ घालवू शकता, ब्रेक घेऊ शकता आणि पुनरागमन करू शकता. परंतु जेव्हा तुम्ही खराब फॉर्ममधून जात असता, धावा करत नसता, तेव्हा मग सचिन तेंडुलकर असो किंवा राहुल द्रविड, आपल्या सर्वांना नेट्समध्ये अधिक वेळ घालवावा लागतो,” असे आयपीएलदरम्यान शॉ याला सल्ला देताना कैफ म्हणाला होता.

तो पुढे म्हणाला होता की, “जेव्हा तुम्ही नवीन चेंडूविरुद्ध खेळत असता, तेव्हा गोलंदाजांना नेटमध्ये आपल्याविरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी बोलवत जा. मी त्याला म्हटले की, जेव्हा तुम्ही आपल्या फीटनेसवर लक्ष देता, तेव्हा तुम्ही अतिरिक्त झेल घेता, अतिरिक्त फलंदाजी करता, धावता, जिममध्ये ट्रेनिंग करता आणि आपल्या बुद्धीलाही ट्रेन करता.”

“विराट कोहली याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. तुम्ही तुमच्या बुद्धीला फीटनेससह ट्रेन करता. जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीतून जात असता, तंत्राव्यतिरिक्त जर तुम्ही मानसिकरीत्या मजबूत असाल, तेव्हा तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत मिळते,” असेही फीटनेसबाबत बोलताना कैफ म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ‘ही’ रणनीती वापरा; गौतम गंभीरचा अजिंक्य रहाणेला सल्ला

‘गेल स्टॉर्म’ पुन्हा येणार; ‘या’ स्पर्धेतून ख्रिस गेल करणार पुनरागमन

…म्हणून धोनीच्या शेतातील भाज्यांची किंमत आहे स्वस्त; घ्या जाणून

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.