भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे .या मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेवून भारतात परतला आहे.पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर विराटचे असे भारतात परतने अनेक दिग्गज क्रिकेटरांना आवडले नाही. अनेक क्रिकेट चाहत्यांनी विराटला ट्रोल देखील केले होते. या दरम्यानच माजी भारतीय क्रिकेटर फारुख इंजिनियर हे विराटच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
इंजिनीयर एका वेबसाईटला दिलेल्या इंटरव्यू मध्ये म्हणाले, “विराट कोहलीला ट्रोल केल्या जाण्याच्या मी पूर्णतः विरोधात आहे.विराटने पालकत्व रजा घेऊन पहिल्या आपत्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याला त्रास देणे चुकीचे आहे.”
इंजिनीयर पुढे म्हणाले, ”साउथ अमेरिकेमध्ये लोक फुटबॉल साठी फार उत्साहीत आसतात. त्याच प्रकारे आपल्या इथे लोक क्रिकेटला पसंत करतात. विदेशातील भारताच्या पराभवानंतर खेळाडूंचे घर जाळले जातात व दुसऱ्या दिवशी जेव्हा विजय मिळतो तेव्हा लोक झाडाच्या उंचीपर्यंत पोचवतात. खेळाप्रती लोकांची ही भावना बघणे आनंददायी असते. जेव्हा विदेशी क्रिकेटर भारतात येतात तेव्हा देखील त्यांना तोच आदर मिळतो. जर तुम्ही उत्तम क्रिकेटर असाल तर तुमची प्रशंसा केली जाते.”
वर्तमान परिस्थिती कशाप्रकारे वेगळी आहे हे सांगताना इंजिनिअर म्हणाले, ”मला चार मुले आहेत. मी कोणत्याही मुलाच्या जन्मावेळी पत्नीसोबत नव्हतो. मी प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त होतो. इतकेच काय तर एकदा मी लॉर्ड्स येथे खेळत असताना इंग्लंडच्या राणीने मला मुलाच्या जन्माबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. आता वेळ पूर्णता बदलली आहे. मात्र मी यात विराटला ट्रोल करणार नाही. हे गरजेचे नाही की तेव्हा जी परिस्थिती होती,ती आताही असेल.”
महत्वाच्या बातम्या:
– मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माची संघाचा उपकर्णधार म्हणून निवड
– बाबा झालो रे!! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या घरी हलला पाळणा, पोस्टद्वारे दिली खुशखबर
– ब्रेकिंग! उर्वरित कसोटी सामन्यांकरिता भारताच्या कसोटी संघात उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी