भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टी20 मालिकेतील दुसरा सामना आज, बुधवार, 09 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. याआधी ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. वेगवान गोलंदाज मयंक यादवने ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता हर्षित राणाला दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी20 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
हर्षित राणा दिल्लीहून येतो. अशा परिस्थितीत तो आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवू शकतो. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना हर्षितने चमकदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत जवळपास सर्वच गोलंदाज महागडे ठरत असताना हर्षित अतिशय किफायतशीर ठरला.
हर्षितने 2024 च्या आयपीएलमध्ये 13 सामने खेळले. या सामन्यांच्या 11 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 20.15 च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने 9.08 च्या इकॉनॉमीवर धावा दिल्या. हर्षितने त्याच्या संथ चेंडूंनी फलंदाजांना खूप त्रास दिला.
हर्षितचा टीम इंडियात समावेश होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी श्रीलंका दौऱ्यातही हर्षितला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आलं होतं. मात्र श्रीलंका दौऱ्यावर त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. आता हर्षित बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मध्ये पदार्पण करेल अशी अपेक्षा सोशल मीडियातून व्यक्त केली जात आहे.
दिल्लीकडून देशांतर्गत खेळणाऱ्या हर्षितने आतापर्यंत 9 प्रथम श्रेणी, 14 लिस्ट ए आणि 25 टी20 सामने खेळले आहेत. 16 प्रथम श्रेणी डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 24.75 च्या सरासरीने 36 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने लिस्ट ए च्या 14 डावांमध्ये 23.45 च्या सरासरीने 22 विकेट्स घेतल्या आहेत. टी20 च्या उर्वरित 23 डावांमध्ये त्याने 23.64 च्या सरासरीने आणि 8.94 च्या इकॉनॉमीने 28 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा-
WTC इतिहासात अशी कामगिरी करणारा जो रुट पहिलाच, टाॅप-10 मध्ये रोहित शर्मा एकमेव भारतीय
शाकिबनंतर आता हा अनुभवी क्रिकेटपटू निवृत्तीच्या वाटेवर; भारताविरुद्ध खेळणार शेवटचा सामना
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; कर्णधार हरमनप्रीतच्या फिटनेसबाबत महत्त्वाचे अपडेट समोर