---Advertisement---

कोरोनाचा मोठा फटका; भारतीय संघाला खेळताना पहायचे असेल, तर पहावी लागू शकते एक वर्ष वाट

On: गुरूवार, जुलै 16, 2020 2:05 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे इंग्लंड क्रिकेट संघाचा सप्टेंबर महिन्यातील भारत दौरा स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि भारत ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

इंग्लंडच्या माध्यमांनुसार, ही मालिका पुढील वर्षी मार्च महिन्यानंतरपर्यंत स्थगित केली जाऊ शकते. तरीही बीसीसीआयने याबाबतीत आतापर्यंत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

इंग्लंड संघाला पुढील वर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत भारत दौऱ्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशामध्ये इंग्लंड आणि भारत संघात होणाऱ्या ३ वनडे आणि ३ टी२० असे मिळून ६ सामन्यांची मालिका मार्चनंतर खेळली जाऊ शकते.

अपेक्स काऊंसिलच्या बैठकीनंतर होऊ शकते घोषणा

शुक्रवारी (१७ जुलै) बीसीसीआय अपेक्स काऊंसिलची बैठक होणार आहे. यानंतर इंग्लंड आणि ऑगस्टमध्ये होणारा न्यूझीलंड- अ संघाचा भारत दौरा स्थगित करण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना म्हटले, की भारतात कोरोना व्हायरसची जी परिस्थिती आहे, ती पाहता इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला नाही पाहिजे.

ऑगस्ट महिन्यापर्यंत सुरु होऊ शकतात प्रशिक्षण शिबीर

“न्यूझीलंड- अ संघही ऑगस्ट महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. हा दौरा होणेदेखील कठीण दिसत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनेही (Sourav Ganguly) नुकत्याच एका मुलाखतीत म्हटले होते, की परिस्थितीत सुधारणा झाली, तर ऑगस्ट महिन्यात प्रशिक्षण शिबीर सुरु केले जाऊ शकतात. ही स्पष्ट बाब आहे की अशा कोरोनाच्या परिस्थितीत कोणताही सामना खेळला जाऊ शकत नाही,” असे बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये होऊ शकते आयपीएल

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा आणि ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपासून होणारा टी२० विश्वचषक स्थगित झाला, तर आयपीएलसाठी एक मोठा कालावधी (विंडो) मिळू शकतो. आयपीएलचे आयोजन भारत किंवा परदेशात होऊ शकते.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील मागील वनडे मालिका मार्चमध्ये होणार होती. परंतु मालिकेतील पहिला सामना १२ मार्च रोजी पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकीशिवाय रद्द झाला होता, तर उर्वरित २ सामने कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले होते.

ट्रेंडिंग घडामोडी-

-त्यांना दुसरे सुनील गावसकर म्हटले जायचे, पण केवळ ३७ कसोटी सामन्यानंतर संपली कारकीर्द

-विराटचा खास मित्र होणार तिसऱ्यांदा बाप; अनुष्काने दिल्या शुभेच्छा!

-ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाची पत्नी करतेय न्यायालयात सर्वांची बोलती…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---