---Advertisement---

मॅच न खेळता भारताने केला विश्वविक्रम, सामनाच्या 200 दिवस आधीच सर्व तिकिटांची विक्री!

On: बुधवार, डिसेंबर 11, 2024 12:05 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे. ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ बरोबरीत आहेत. या मालिकेतील शेवटचा पाचवा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान, पुढील वर्षी जूनमध्ये टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून तिथे दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर सुरू होईल. आता अशी बातमी समोर आली आहे की ती पाहून कोणीही थक्क होईल. खरंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे. ज्यासाठी पहिल्या 4 दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड बर्मिंघम कसोटी सामना 2 जुलै 2025 रोजी सुरू होईल. ज्याला अजून 203 दिवस बाकी आहेत. सुमारे 7 महिन्यांपूर्वी विकले गेलेले मैदान हे इंग्लंड आणि भारतातील क्रिकेटची क्रेझ वेगळ्या पातळीवर असल्याचा पुरावा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील या मालिकेला पतौडी ट्रॉफी असे नाव देण्यात आले असून त्यातील पहिला सामना 20 जूनपासून लीड्स येथे खेळवला जाणार आहे. तर बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या सामन्याच्या पहिल्या चार दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. आता कोणाला दुसऱ्या कसोटीचा आनंद घ्यायचा असेल तर तो फक्त पाचव्या दिवसासाठी तिकीट खरेदी करू शकतो.

खुद्द एजबॅस्टन स्टेडियमच्या ट्विटर हँडलने या संदर्भात माहिती शेअर केली आहे की पहिल्या चार दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. ज्यात येथील तिकिटांची किंमत 2,700 रुपयांपासून 32 हजार रुपयांपर्यंत जाते. तर 16 वर्षांखालील मुलांसाठी तिकिटाची किंमत 10 पौंड म्हणजेच सुमारे 1,080 रुपये ठेवण्यात आली आहे. ऍशेस वगळता, पहिल्या चार दिवसांच्या तिकिटांची आगाऊ विक्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे तिकिटांची विक्री 7 महिने आधीच झाली आहे.

हेही वाचा-

ICC Women ODI Rankings; दक्षिण आफ्रिकेची ही खेळाडू अव्वलस्थानी, टाॅप 10 मध्ये एकच भारतीय
विराट-रोहित नाही, तर हार्दिक पांड्या या वर्षातील सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू, कुस्तीपटू विनेश फोगट अव्वलस्थानी
पंजाब किंग्जच्या या खेळाडूकडे संघाचं नेतृत्व, या लीग मध्ये दिसणार कर्णधाराच्या भूमिकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---