आशिया चषक 2022 मधील चौथा सामना बुधारी (31 ऑगस्ट) दुबई येथे भारत विरुद्ध हाँगकाँग संघात खेळला जाईल. भारतीय संघ हा सामना जिंकत सुपर-4 फेरीतील जागा निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर हाँगकाँगचा संघ आशिया चषकातील आपला पहिलाच सामना जिंकत विजयी सुरुवात करण्यासाठी झटताना दिसेल. उभय संघांची टी20 स्वरूपात आशिया चषकात होणारी ही पहिलीच लढत असेल.
चार वर्षांपूर्वी हाँगकाँगने भारताला दिली होती काट्याची टक्कर
हाँगकाँगचा संघ (India vs Hongkong) हा भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचा मिळून बनलेला संघ आहे. जरी हा भारत आणि हाँगकाँग संघातील पहिलाच टी20 सामना असला, तरीही 4 वर्षांपूर्वी आशिया चषकात झालेल्या वनडे सामन्यात त्यांना भारताला काट्याची टक्कर दिली होती. भारताने वनडे क्रिकेटमध्ये हाँगकाँगविरुद्ध आतापर्यंत 2 वनडे खेळले आहेत आणि दोन्हीतही विजयश्री प्राप्त केली आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग (Predicted Playing Xi) इलेव्हन-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, आर अश्विन, आवेश खान, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह
हाँगकाँग: निजाकत खान (कर्णधार), बाबर हयात, यास्मीन मुर्तजा, किनचित शाह, स्कॉट मैककेनी (यष्टीरक्षक), हारून अरशद, एजाज खान, जीशान अली, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गजानफर
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्ताननंतर हाँगकाँगची बारी; कधी, कुठे, कसा पाहाल सामना? संभाव्य इलेव्हनवरही टाका नजर
तब्बल 18 वर्षाच्या अद्वितीय प्रवासानंतर आदित्य तरेचा मुंबईला ‘गुडबाय’; या संघाचे करणार नेतृत्व
वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी