भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2022 मधील दुसरा सामना गुरुवारी सिडनीमध्ये खेळला. नेदरलॅड्सविरुद्धच्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ दाखवला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या तिघांनी अर्धशतके ठोकली आणि संघाला अपेक्षित धावसंख्येपर्यंत घेऊन गेले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मर्यादित 20 षटकांमध्ये भारताने 2 बाद 179 घाना केल्या.
भारताचे नियमित सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी डावाची सुरुवात केली. रोहितने चांगले प्रदर्शन केले, पण राहुल मात्र स्वस्तात बाद झाला. टी-20 विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात राहुल अपयशी ठरल्यामुळे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध 4 धावा केल्या होत्या, तर नेदरलँड्सविरुद्ध अवघ्या 9 धावा करून विकेट गमावली. राहुलने या सामन्यात एकूण 12 चेंडू खेळले.
रोहित शर्मा मात्र कर्णधारपदाला साजेशी खेळी करू शकला. त्याने 39 चेंडूत 53 धावा कुटल्या. यामध्ये चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. रोहितला सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने चांगली साथ दिली आणि वैयक्तिक अर्धशतक देखील पूर्ण केले. रोहित बाद झाल्यानंतर विराटने भारतीय संघाचा डाव सांभाळला. विराटने एकूण 44 चेंडू खेळला आणि 62 धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) नेहमीच भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये वादळी खेळी करत आला आहे. त्याने या सामन्यात देखील असेच प्रदर्शन केले. सूर्याने एकूण 25 चेंडू खेळले आणि नाबाद 51 धावा कुटल्या. 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. रोहित विराट आणि सूर्यकुमारच्या अर्धशतकीय योगदानामुळे भारताने अपेक्षित धावसंख्या गाठली. नेदरलँड्ससाठी पॉल वॅन मीकरेन आणि फ्रेड क्लासेन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकातील सर्वात भारी व्हिडिओ, अर्धशतकवीर सूर्याला सेलिब्रेशन करण्यास विराटने पाडले भाग
दक्षिण आफ्रिकेने उडवला बांगलादेशचा धुव्वा! 104 धावांनी विजय मिळवत पोहोचले टॉपला