---Advertisement---

INDvNZ, 3rd T20: तिसऱ्या टी२०त पाऊस घालणार खोडा? जाणून घ्या कसे असेल कोलकात्याचे हवामान

On: रविवार, नोव्हेंबर 21, 2021 5:09 PM
---Advertisement---

भारतीय संघाने शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी-२० सामना खेळला. हा सामना जिंकत भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे.

या मैदानावर भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाने या मैदानावर चार टी-२० सामने खेळले आहेत, ज्यातील दोन सामने जिंकले आहेत. उर्वरित सामन्यांपैकी एक सामना रद्द करण्यात आला होता, तर एका सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या मैदानावर भारतीय संघाने शेवटचा टी-२० सामना २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारताने ५ गडी राखून विजय मिळवला होता. ईडन गार्डन्सवर खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्याआधी कोलकाताच्या हवामानाविषयी मोठी बाब समोर आली आहे.

भारत आणि न्यूझीलंडच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोलकात्यात रविवारी (२१ नोव्हेंबर) सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता नसणार आहे. कोलकातामध्ये हवामान सामान्य राहील. दिवसाचे तापमान ३२ अंशांच्या आसपास राहील. त्याचबरोबर आर्द्रताही ५९ टक्के राहील. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग ताशी ९ किमी राहील. सायंकाळनंतर तापमान २२ अंशांपर्यंत खाली येऊ शकते. अशा स्थितीत खेळाडूंना बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे.

सामन्याच्या दिवशी कोलकात्यात संध्याकाळी साधारण ५ वाजता सूर्यास्त होणार आहे. त्यामुळे लवकरच दव पडायला सुरुवात होईल. ईडन गार्डन हे फलंदाजीसाठी खूप चांगले राहिले आहे. सामन्यादरम्यान धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला नंतर फलंदाजी करणे सोपे होईल. अशा परिस्थितीत तिसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला नंतर फलंदाजी करायला आवडेल. इडन गार्डन्सवर सरासरी धावसंख्या १४२ इतकी राहिली आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंडचा संघ : टीम साऊदी (कर्णधार), टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, ऍडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोढी.

महत्त्वाच्या बातम्या-

“लवकरच ‘मिसेस बी’ होणार”, सॅम बिलिंग्सने गर्लफ्रेंड साराबरोबर केला साखपुडा, रोमँटिंक फोटोही केले शेअर

‘देऊन टाक तुझा अवॉर्ड केएल राहुलला’, असं हर्षल पटेलला युजवेंद्र चहल का म्हणाला? पाहा व्हिडिओ

धोनीला चेन्नईत खेळता येणार अखेरचा टी२० सामना? जय शाह यांनी केले मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---