विश्वचषक 2023 स्पर्धेत विजयाचे पंचक करण्यासाठी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) धरमशाला येथे आमने-सामने आहेत. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने योग्य ठरवत संघाला पहिली मोठी विकेट मिळवून दिली. यामध्ये श्रेयस अय्यर याचेही मोलाचे योगदान होते.
सिराजने कॉनवेला धाडलं तंबूत
या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडकडून डावाची सुरुवात करण्यासाठी विस्फोटक डेवॉन कॉनवे आणि विल यंग उतरले होते. यावेळी डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने जसप्रीत बुमराह टाकत असलेला डावातील पहिले षटक निर्धाव खेळले. त्यानंतर डावातील चौथ्या षटकात मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) गोलंदाजीसाठी आला. यावेळी कॉनवे स्ट्राईकवर होता. त्याने पहिले दोन्ही चेंडू निर्धाव खेळले. मात्र, त्याला तिसऱ्या चेंडूवर सिराजने बाद केले.
Mohammed Siraj…..!!!! Gets the opening wicket.
Devon Conway dismissed for a 9 ball duck! pic.twitter.com/Nosttoapjx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
सिराजने टाकलेला चेंडू कॉनवेच्या बॅटला लागून स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. यावेळी तिथे भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर उभा होता. श्रेयसने कोणतीही चूक न करता शानदार झेल घेतला. यावेळी श्रेयसने आपल्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाकडे सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक देण्याचा इशारा केला. श्रेयसने झेल घेतल्यामुळे फलंदाज कॉनवेला खातेही न खोलता तंबूचा रस्ता पकडावा लागला.
कॉनवेने या सामन्यात एकूण 9 चेंडूंचा सामना केला, पण त्याला एकही धाव करता आली नाही. तो शून्यावर बाद झाला. त्याच्या विकेटमुळे न्यूझीलंडला 9 धावांवरच पहिला धक्का बसला. (india vs new zealand icc world cup 2023 mohammed siraj takes devon conway wicket shreyas iyer catch)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड-
डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
हेही वाचा-
IND vs NZ Toss: महत्त्वाच्या सामन्यात रोहितने जिंकली नाणेफेक, पंड्यासह ‘या’ खेळाडूला केलं संघाबाहेर
कहर! WBBLमध्ये ‘या’ खेळाडूने फक्त 23 चेंडूत चोपल्या 114 धावा, चौकार-षटकारांच्या पावसात बॅटही तुटली