भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना बेंगळुरूच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने वर्चस्व गाजवत 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. बेंगळुरूच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळाली होती. पण आता दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला जाणार आहे. या मैदानावरील खेळपट्टीवर कोणाला मदत मिळणार? हे पाहणंदेखील उत्सुकतेचं ठरेल. पुण्यातील कसोटी (24 ते 28 ऑक्टोबर) दरम्यान खेळली जाणार आहे.
पुणे कसोटीत भारतीय संघ न्यूझीलंडला हरवू शकतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेथील खेळपट्टी. इंडिया टुडेमधील एका बातमीनुसार पुण्याची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकते. असे झाले तर भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 फिरकीपटूंना संधी देऊ शकतो. त्यामध्ये कुलदीप यादव (Kuldeep Yadav), रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांचा समावेश असेल.
टॉम लॅथमच्या (Tom Latham) नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने पुण्यात सराव करताना खूप घाम गाळला. जर आपण न्यूझीलंडच्या गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोललो तर ते खूप मजबूत आहेत. पण फिरकीच्या बाबतीत भारतीय संघ न्यूझीलंडला अडचणीत आणू शकतो. असे झाल्यास भारतीय संघ पुण्यात वर्चस्व गाजवू शकतो.
न्यूझीलंविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर
महत्त्वाच्या बातम्या-
“गौतम गंभीरच्या नजरेला नजर मिळवायला भीती वाटायची”, संजू सॅमसनने सांगितला प्रसंग
जो रूट मोडणार तेंडुलकरचा रेकाॅर्ड? माजी दिग्गजाचे मोठे विधान
IND vs NZ : शतक झळकावूनही सरफराजला बाकावर बसावे लागणार, राहुलला मिळणार आणखी संधी!