---Advertisement---

कोणाची फलंदाजी तर कोणाची गोलंदाजीत कमाल! सराव सामना अनिर्णीत राहूनही भारताला ‘असा’ झाला फायदा

---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. ही सुट्टी संपवून भारतीय संघाने आगामी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी कसून सरावाला सुरुवात केली आहे. याच सरावाचा एक भाग म्हणून भारत आणि सिलेक्ट काउंटी इलेव्हन या संघांमध्ये ३ दिवसीय सराव सामना पार पडला. हा सामना अनिर्णीत राहिला असला तरी भारतीय संघासाठी ही एक सकारात्मक बाब आहे.

भारतीय संघाकडून या सराव सामन्यात मयंक अगरवाल ,रवींद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. इंग्लंड संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी ही एक सकारात्मक बाब आहे. मयंक अगरवालने या सामन्यात २८ आणि ४७ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने चेतेश्वर पुजारासोबत मिळून ८७ धावांची भागीदारी केली. तसेच केएल राहुलने पहिल्या डावात फलंदाजी करत १०१ धावांची शतकी खेळी केली होती. (India Vs select county eleven practise match draw but these are 5 positive performance for Indian team)

तसेच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सर जडेजा याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने पहिल्या डावात ७५ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात देखील त्याने ५१ धावांची खेळी केली. तसेच युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने देखील आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात १३ षटक गोलंदाजी करत २ गडी बाद केले होते.

तसेच वेगवान गोलंदाज उमेश यादव याने देखील अप्रिम गोलंदाजी केली आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात २५ षटक गोलंदाजी केली. या दरम्यान त्याने २२ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्लॉप ठरलेल्या जसप्रीत बुमराहने या सामन्यात १ गडी बाद केला.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंड दौऱ्यावरील पहिला सराव सामना अनिर्णित, ‘या’ खेळाडूंनी दाखवला दम

भुवीने हार्दिकच्या फिटनेसबाबत दिली महत्त्वाची माहिती, तिसऱ्या वनडेत खेळणार की नाही केले स्पष्ट

बाजीगर रिषभ! कोरोनावर मात करून परतल्यानंतर टीम इंडियाने पंतचे असे केले ‘ग्रँड वेलकम’, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---