---Advertisement---

विश्वचषक २०१९: रोहित शर्मा, विराट कोहलीने घेतले शानदार झेल, पहा व्हिडिओ

On: बुधवार, जून 5, 2019 6:20 PM
---Advertisement---

साउथँम्पटन। 2019 क्रिकेट विश्वचषकात आज आठवा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सुरुवातीलच दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला आणि क्विंटॉन डीकॉक या सलामी जोडीला बाद करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली.

त्याने आमलाला या सामन्यातील चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 6 धावांवर बाद केले. बुमराहने ऑफ स्टंपच्या आउटसाईडला टाकलेल्या या चेंडूवर अमलाने खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या बॅटला लागून स्लिपच्या दिशेने गेला. यावेळी दुसऱ्या स्लीपमध्ये उभे असलेल्या रोहित शर्माने अमलाचा शानदार झेल घेतला.

https://twitter.com/im_maqbool/status/1136213886812577792

त्यानंतर लगेचच सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डीकॉकला 10 धावांवर बुमराहने बाद केले. डीकॉकने बुमराहच्या या चेंडूवर कव्हर ड्राईव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू त्याच्या बॅटला लागून मागे गेला. पण तिसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या विराट कोहलीने कोणतीही चूक न करता हा झेल घेतला.

https://twitter.com/im_maqbool/status/1136218178609008641

त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था 2 बाद 24 धावा अशी झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस(38) आणि रस्सी वॅड डर दसन(22) यांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सांभाळला.

ही भागीदारी युजवेंद्र चहलने तोडली. त्याने एकाच षटकात या दोघांनाही बाद करत दक्षिण आफ्रिकेला मोठे धक्के दिले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषक २०१९: इंग्लंड आणि पाकिस्तानच्या या खेळाडूंना झाला दंड, जाणून घ्या कारण

विश्वचषकातून बाहेर पडलेल्या डेल स्टेनला विराट कोहलीने दिला भावनिक संदेश, पहा व्हिडिओ

विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारताचा ११ जणांचा संघ

जेव्हा जेव्हा भारत विश्वचषकातील पहिला सामना जिंकतो…

विश्वचषक २०१९: …तर आजचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना होऊ शकतो रद्द

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment